बिझनेस म्हणजे ‘बिझिनेस’ नव्हे, थोडा वेळ कुटुंबाला ही द्या!  विराटने लेकीसाठी काढली सुट्टी!

बिझनेस म्हणजे ‘बिझिनेस’ नव्हे, थोडा वेळ कुटुंबाला ही द्या! विराटने लेकीसाठी काढली सुट्टी!

सध्या चर्चा आहे ती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने घेतलेल्या पितृत्व रजेची (पॅटर्निटी लीव्ह) विराट आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना 11 जानेवारीला कन्यारत्न झाले. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट डिसेंबरमध्येच पितृत्व रजेसाठी मुंबईत परतला होता. विराटने घेतलेली रजा सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. काहीजण त्याच्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत तर काहींकडून तो टीकेचा धनी देखील झाला आहे. काहींनी तर त्याला अव्यावसायिक (अनप्रोफेशनल), देशावर प्रेम नसणारा म्हटले आहे. विराट कोहली हा सर्वोत्कृष्ट खेळाडू असण्याबरोबरच तो एक मोठा उद्योजक आहे. त्याच्या मागे अनेक कामांचा व्याप आहे. पण, असे असतानाही त्याने आपल्या जबाबदाऱ्यांतून कुटुंबासाठी काढलेला हा वेळ नक्कीच कौतुकास्पद आहे.       

 

विराट कोहलीचे बिझनेस..

व्रॉगन (Wrogn)

विराट कोहलीचा व्रॉगन हा फॅशन ब्रँड आहे. फ्लिपकार्ट आणि मिंत्रावर त्याच्या ब्रँडचे कपडे उपलब्ध असतात. युएई आणि सौदी अरेबियामध्ये सुद्धा त्याचा ब्रँड आता उपलब्ध आहे.

नेवा (Nueva)

2018 मध्ये कोहलीने दिल्लीमध्ये त्याचं नेवा हे साऊथ-अमेरिकन रेस्टॉरंट सुरू केलं. विराटने पत्नी आणि मित्रांसह अनेकदा या रेस्टॉरंटला भेट दिली आहे. त्याच्या आरसीबी संघासोबतही तो तिथे गेला होता.

 

One8 आणि One8 कम्युन

त्याचा आणखी एक ब्रँड आहे ज्याचं नाव आहे वन8. त्याच्या जर्सी नंबरवरून हे नाव देण्यात आलं आहे. प्युमा या ब्रँडच्या सहयोगानं त्याचं काम चालतं. हे एक स्पोर्ट वेअर ब्रँड असून यामध्ये वन8 ला समर्पित फुटवेअर, एक्सेसरीज चा समावेश आहे. नेवाच्या व्यतिरिक्त कोहलीचं आणखी एक रेस्टॉरंट दिल्लीत आहे, ज्याचं नाव आहे वन8 कम्युन. जे वन8 च्या रेस्टॉरंट चेनचं मास्टर फ्रँचाईज आहे.      

चिजेल इंडिया (Chisel india)

एम. एस. धोनी प्रमाणेच कोहलीचे देशभरात अनेक फिटनेस सेंटर्स आहेत. 2015 मध्ये कोहलीने यात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.  

स्पोर्ट कॉन्व्हो (Sport Convo)

स्पोर्ट कॉन्व्हो नावाचं त्याचं जॉईंट व्हेंचरही आहे. फुटबॉल खेळाडू गॅरेथ बेल आणि उद्योजक विशाल पटेल यांच्यासोबत त्याची भागिदारी आहे.

 

FC गेवा, UAE रॉयल्स आणि बेंगलुरू योद्धाज

क्रिकेट सोबतच कोहलीला फुटबॉल खेळाची देखील आवड आहे. इंडियन सुपर लीग टीममध्ये त्याची एफसी गोवा नावाची टीम आहे. टेनिसचे प्रख्यात खेळाडू रॉजर फेडरर यांच्यासोबत त्याची युएई रॉयल्स ही टेनिस टीम आहे. याशिवाय बेंगलुरू योद्धा नावाची कुस्तीची टीम देखील आहे.

स्टेपथलॉन किड्स (Stepathlon Kids)

स्टेपथलॉन किड्स मध्ये सुद्धा विराटची भागिदारी आहे. वय वर्ष 8 ते 12 च्या बालकांना सक्रिय राहण्यासाठी तसेच पौष्टीक खाण्यावर ही ऑनलाईन कम्युनिटी मदत करते.  

 

एखाद्या उद्योजकाला कामाचा किंवा जबाबदाऱ्यांचा व्याप कितीही असला तरीही काही वेळा त्यांनाही सुट्टी घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सततच्या कामातून विश्रांती मिळते. ताण कमी होतो. नवीन विचारांना चालना मिळते. मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि पुन्हा नव्या दमाने कामाला सुरुवात करता येते. एक उद्योजक म्हणून घ्यावा लागणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या बरोबरीने कौटुंबिक पातळीवरील जबाबदाऱ्या यशस्वीरित्या घेता आल्या, तर कुटुंबाचा विश्वास मिळवण्याबरोबच त्यांचा सकारात्मक पाठिंबाही मिळतो.          

 तुमचा बिजनेस 10 पटीने वाढण्यासाठी स्नेहलनीतीचा 10X MBA ONLINE अँप 30 दिवसांसाठी विनामूल्य डाऊनलोड करा... http://www.10xmbaonline.com/

बिजनेसमधून भरपूर संपत्ती कशी कमवाल ? या स्नेहलनीतीच्या आगामी विनामूल्य वेबिनारसाठी नावनोंदणी करा... व्हाट्सअप करा +91 93217 46252 किंवा इथे क्लिक करा https://snehalniti.com/webinar/ बिजनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिजनेस व्हिडीओ पहा फक्त स्नेहलनीती युट्युबचॅनेलवर...https://youtube.com/c/SnehalNiti Kindly follow us on Website : http://snehalniti.com/ Facebook : https://goo.gl/6KRcKy Youtube : https://goo.gl/X89tjD Twitter : https://goo.gl/gWrUcD Download Snehalniti Android App : https://goo.gl/PBxA75