उद्योजक बनण्यासाठी टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचे!

उद्योजक बनण्यासाठी टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचे!

जीवनात वेळेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. जर आपण प्रत्येक गोष्टीचे वेळापत्रक केले की आपण जीवनात कधीच अपयशी होणार नाही. मात्र एक गोष्ट नक्की की ध्येय गाठण्यासाठी ध्येय उराशी बाळगणं तितकंच महत्त्वाचं…
वर्षाचे दिवस, दिवसांचे तास, तासातील सेकंद… हा सारा वेळ लहान-थोर, गरीब-श्रीमंत अशा सर्वांच्या वाट्याला सारखाच येतो. असं असून एखाद्याजवळ प्रचंड वेळ असतो. डोंगराएवढी कामं तो उभी करतो. एकाच वेळी वेगवेगळय़ा प्रकारच्या जबाबदाऱ्या एकटाच पार पाडतो. तर काहींना कशासाठीच वेळ नसतो. अभ्यासाला वेळ नाही. घरच्यांशी बोलायला वेळ नाही. छंद जोपासायला वेळ नाही. याचं कारण एकच वेळेचं व्यवस्थापन त्यानं नीट केलेलं नसतं. असं व्यवस्थापन करणं म्हणजेच आपण उठणार कधी, झोपणार कधी आणि जागेपणी कोणकोणत्या गोष्टी, किती वेळ करणार याचा आराखडा तयार न करणं. प्रत्येकाचा आराखडा वेगळा असतो. हाती असलेल्या 24 तासांपैकी तुम्ही कामाला, अभ्यासाला, विश्रांतीला, वैयक्तिक कामांना, करमणूक, छंद इत्यादींना किती वेळ देणार हे ठोस ठरवायला हवं. यापैकी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते.


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


दिवसभरात कोणकोणती कामं करायची त्या कामांची यादी बनवणं. कामाची यादी आदल्या दिवशी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी करता येईल. त्यामुळे कॅलेंडर किंवा कामाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेता येतं किंवा कामांची यादी करून आवश्यकतेनुसार त्यात बदलही करता येईल. या दोन्ही पद्धतींचा उपयोग गरज भासेल त्याप्रमाणेही करता येणं शक्य आहे. त्यामुळे कामाचं प्राधान्य लक्षात घेऊन एकापाठोपाठ एक काम उरकणं शक्य होतं.  फक्त बदललेल्या जीवनशैलीत या सर्व जुन्या गोष्टी तंतोतंत पाळता येतातच असं नाही. पण प्रयत्न करायला हवा... 


टाईम मॅनेजमेंटमुळे उत्पादन क्षमता वाढवता येते. मनावरच्या ताणाची पातळी कमी करता येते. व्यवसायातील कामे आणि व्यक्तिगत आयुष्यात पार पाडायच्या गोष्टी यांचा समतोल साधता येणे शक्य होते.
 
जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय काय आहे  ते समजून घेतल्यानंतर तुमचे अग्रक्रम ठरवू शकतात. तुम्हाला लाभदायक ठरतील अशा गोष्टींना आधी वेळ देणं हे महत्त्वपूर्ण ठरतं. त्यासाठी तुमच्यासमोर नेहमीच एखादं उद्दिष्ट अथवा ध्येय असणे  गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या कामाला आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही जो वेळ देता त्याला एक दिशा प्राप्त होते. मात्र हे उद्दिष्ट सुरुवातीलाच निश्चित करावे. ते कसे, कधी आणि कितपत पूर्ण करता येईल, याचा आरखडा आखलेला असावा. ते उद्दिष्ट तुम्हाला झेपेल असे असावे.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


आजच्या अत्यंत व्यस्त जीवनशैलीत वेळेचे व्यवस्थापन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. वेळेच्या व्यवस्थापनामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करता येतो आणि त्यानुसार कामे उरकता येतात. अत्यंत घाईगर्दीच्या वेळेस अचानक उद्भवलेली महत्त्वपूर्ण कामे वेळेत पूर्ण करता येतात आणि परिस्थितीवर ताबा मिळवणे शक्य होते. प्रत्येक उद्योजकाला टाईम मॅनेजमेंट करता याला हवे कारण तेच टाईम मॅनेजमेंट त्यांच्या कंपनीचे भविष्य ठरवते.