कसे बनले उत्तम केंजळे सेफ्टी शूजचे मालक!

कसे बनले उत्तम केंजळे सेफ्टी शूजचे मालक!

गरीब घराण्यात जन्माला येऊनही आज उत्तम केंजळे यांची कोटींची उलाढाल मार्केटमध्ये चालते . हे त्यांना कसं शक्य झालं? असं त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांच्या भूतकाळावर मात केली आणि सर्वांनाच हेवा वाटेल असे उद्योजकीय विश्व निर्माण केले? हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा तुम्हाला पण  लागलेली असेल. चला तर मग आपण जाणून घेऊया त्यांच्या या यशाचे रहस्य...


उत्तम केंजळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील तडवळे गावी झाला. बालपण प्रचंड हालाकीत गेलं.  मुंबईत त्यांच्या वडिलांनी १३ हजार रुपये व्याजावर एक झोपडं विकत घेतलं. वडील निवृत्त होईपर्यंत हे तेरा हजार ते फेडत होते. यावरून आपल्याला त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.. पुढे त्यांनी एक रिक्षा घेऊन एका माणसाला चालवायला दिली व ते गावी निघून गेले. तिथे ते शेती करू लागले.. 


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


रिक्षाची कमाई उत्तम हे आपल्या वडिलांना ती कमाई गावी पाठवू लागले. त्यांचे वडील जरी गावी गेले तरी उत्तम यांना मुंबई सोडवेना. या लखलखत्या मुंबई नगरीत आपलंही एक घर असावं, आपणही आपलं नशीब आजमवून बघावं ही स्वप्ने मुंबईत येणारे प्रत्येक जण पाहतात. ही स्वप्ने आता उत्तम केंजळे यांच्या डोळ्यात झळकू लागली होती.. सुरुवातीला आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी अनेक छोटी छोटी कामे केली.


पासपोर्ट ऑफिसबाहेर फॉर्म भरून द्यायला सुरुवात..
एकदा ते पासपोर्ट ऑफिसमध्ये गेले असता एका एजेंटला त्यांनी १० रुपयाचे फॉर्म्स २५ रुपयाला विकताना पाहिले. त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. धंदा कसा करावा याचं ते मिळालेलं पहिलं शिक्षण होतं..

मुळातच जिद्दी असलेले उत्तम केंजळे यांनी ठरवलं की आपणही येथे बसून धंदा करायचा. पण जुने एजेंट त्यांना तिथे प्रवेश करू देत नव्हते.
त्यांनी पासपोर्ट ऑफिसच्या जवळ असलेल्या चहावाल्याकडे उभं राहून त्या व्यवसायाचे निरीक्षण केले व नंतर स्वतःच या उद्योगात उतरले. सुरुवातीला तेथील जुन्या लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला. पण त्या सर्वांवर मात करीत त्यांनी आपले बस्तान बसवलेच. कारण ज्याचा निश्चय ठाम असतो, त्याला पराभूत करणे जवळ जवळ अशक्यच आहे.
आधी दिवसाला वीस रुपये मिळू लागले आणि पाहता पाहता वीसाचे शंभर झाले आणि शंभराचे हजार झाले. ते त्या कामात इतके निपूण झाले की पासपोर्ट फॉर्मच्या कोणत्या पानावर कुठे काय लिहिले आहे, हे त्यांना पाठ होते. त्याचबरोबर त्यांनी नंतर रायफल शुटिंगमध्ये अनेक पदके मिळवली.  

मग ते सोसायटीमधल्या टाक्या स्वच्छ करण्याच्या व्यवसायात उतरले. त्यांनी एका व्यक्तीकडून चाळीस हजार रुपयांचं सामान घेतलं. सामान घेण्यसाठी पुरेसे पैसे नव्हते म्हणून हप्त्या हप्त्याने पैसे देऊ लागले..


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


सुरुवातीस त्यांनी टाक्या मोफत स्वच्छ केल्या व त्या अनुभवामुळे त्यांना बरीच कामे मिळत गेली. टाकी स्वच्छ करतानाचे फोटो त्यांनी काढले, शुटिंग केलं. या सर्व गोष्टी त्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी वापरल्या. स्वतःचे ब्रोशल छापले. ते स्वतः बाईकवरुन ब्रोशल वाटू लागले. नंतर त्यासाठी त्यांनी दोन मुले कामाला ठेवली आणि हा उद्योजकीय व्याप वाढत गेला. नंतर त्यांनी काचेची बिल्डिंग स्वच्छ करणारी  १७-१८ मशीन्स  त्यांनी तयार केलया आणि त्यात ही यश मिळवले.


बांधकाम व्यवसायात पदार्पण
हे सर्व करीत असताना त्यांनी कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायातही आपले पाय रोवले. तेरावीत असताना ज्या चाळीत ते राहत होते. ती चाळ डेव्हेलपमेंटला जाणार होती. तिथल्या लोकांच्या आग्रहामुळे उत्तम केंजळे यांना एसआरए कमिटीत स्थान मिळालं. त्या कमिटीत असताना त्यांनी सुमारे ५५० लोकांना घरे मिळवून दिली. एकाही माणसावर उत्तम केंजळे यांनी अन्याय होऊ दिला नाही. 

आता जरी ते त्या सोसायटीत राहत नसले तरी आजही तेथील लोकांच्या ओठांवर उत्तम केंजळे हे नाव असते. एसआरए प्रोजेक्टचा हा अनुभव त्यांना कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात उपयोगी पडला. आपण केलेले कोणतेही काम, मिळालेला कोणताही अनुभव वाया जात नाही. सातार्‍याला जागा घेऊन त्यांनी बिल्डिंग्स उभारल्या आहेत. अजूनही त्यांचे हे काम सुरु आहे.
मग त्यांनी शूज बनवणारी कंपनी विकत घेतली व त्यातूनही नफा कमवला. आता त्यांच्या कंपनीत हेल्मेट, सेल्फ्टी बेल्ट, जॅकेटचेसुद्धा उत्पादन होऊ लागले आहे. त्यांची सेल्स टीम तयार झाली, त्यांनी स्वतःचं कॉल सेंटर ही सुरू केलं. डिस्ट्रीब्यूशनचं एक विशाल जाळं त्यांनी रचलं.
 
उत्तम केंजळे यांचं म्हणणं आहे की तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुमचं प्रॉड्क्ट हे ब्रॅण्ड झालं पाहिजे. कारण पैसे प्रॉड्क्टला मिळत नाही. तर पैसे ब्रॅण्डला मिळतात. हे प्रत्येक उद्योजकाने लक्षात ठेवलं पाहिजे. या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपल्याला अभिनव कल्पना मांडता आली पाहिजे.