लॉकडाऊनमध्ये बिझनेस करताना वापरा या स्ट्रॅटेजीस!

लॉकडाऊनमध्ये बिझनेस करताना वापरा या स्ट्रॅटेजीस!

कोविड-१९ च्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या, इंडस्ट्रीज बंद पडले आहेत. त्यामुळे रोजच्या कमाईवर पोट असलेले अनेक बेरोजगार झालेले मजूर हे स्वतःच्या गावी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर चालत तर काही हे मिळेल त्या वाहतूक सेवेचा आधार घेऊन त्यांच्या राज्यात परत जात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे व्यवसाय क्षेत्रात झालेली आर्थिक घसरण ज्यामुळे अनेक उद्योजकांवर बिझनेस बंद करण्याची वेळ आली आहे. अनेक  उद्योग हे आर्थिक संकटात सापडले आहेत. 
पण इथे आम्ही म्हणू की प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद ही  प्रत्येकात असते, फक्त त्या संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग आपल्याला शोधावे लागतात. यात महाराष्ट्रात अनेक मराठी उद्योजकांना बिझनेस वाढवण्याची संधी प्राप्त होऊ लागली आहे आणि त्यासाठी उद्योजकांनी मार्केटवर त्यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


जे मराठी उद्योजक आर्थिक मंदीच्या संकटात अडकले आहे त्यांनी या संकटातून बाहेर येण्यासाठी पुढील काही स्ट्रॅटेजीसचा वापर करून लॉकडाऊनमध्ये बिझनेस टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. 


१. ग्राहक आणि तुमच्यात पारदर्शकता ठेवा:  
आपण या संकटात सर्व  एकत्र आहोत. त्यासाठी आपला व्यवसाय कसा चालला आहे याविषयी आपल्या ग्राहकांशी पारदर्शक राहणे हा एक उत्तम मार्ग आहे. जोपर्यंत संवाद पारदर्शक होत नाही तोपर्यंत ग्राहक संकटात सापडलेल्या कंपन्यांची आणि व्यवसायांची स्थिती समजू शकत नाही. आपल्याद्वारे ऑफर केलेले उत्पादन आणि चालू असलेल्या समस्या समजून देण्यासाठी ग्राहकांशी संवाद साधा.


२. करार केलेल्या पार्टीशी चांगले संबंध ठेवा: 
हे समजण्याजोगे आहे की लॉकडाऊन दरम्यान आपल्याला विक्रेत्यांना पैसे देणे अवघड जात आहे. त्यासाठी आपल्या विक्रेते, भाडे मालक यांना खरं काय ते कारण सांगणे हे योग्य आहे. कारण पेमेंट्समध्ये काही उशीर होत असेल तर ते देखील पुढील काळासाठी आर्थिक रित्या तयार होऊ शकतील आणि या कठीण काळात तुमचे मार्केटमधील चांगले संबंध बिघडणार नाही.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


३. तुमच्या टीमचा आत्मविश्वास वाढवा: 
तुमच्या व्यवसायातील कामगारांचा तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांना व्यवसायात होणाऱ्या गोष्टींबद्दल सतत अपडेट देत रहा. त्यांच्याशी व्हिडीओ कॉलवर बोला. त्यांच्या आयडीयाज आणि निर्णय सुद्धा ऐकून घ्या. अश्या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या टीमचे मनोबळ वाढवणे गरजेचे आहे.


४. गुंतवणूकदारांशी किंवा तज्ञांशी सल्लामसलत करा: 
तुमच्या व्यवसायावर आलेले संकट यावर तुम्हाला ध्येर्याने मात करायची आहे. तुमच्या व्यवसायातील गुंतवणूकदारांशी किंवा इतर तज्ञांशी तुम्ही या समस्येवर चर्चा करू शकतात. सध्या बिझनेस कसा सांभाळावा या विषयावर अनेक मोठमोठे उद्योजक/ तज्ज्ञ वेबिनार घेत आहेत, ते वेबिनार्स किंवा कोर्स अटेंड करा. जेणे करून तुम्हाला बिझनेसबद्दल नव्या स्ट्रॅटेजीस शिकता येतील. 
या काही गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये आचरणात आणून तुम्ही तुमचा बिझनेस या कठीण काळातही नक्कीच वाचवू शकता.