भारतात ई-वॉलेट सर्व्हिस देणाऱ्या या कंपन्यांना तुम्ही ओळखता का?

भारतात ई-वॉलेट सर्व्हिस देणाऱ्या या कंपन्यांना तुम्ही ओळखता का?

आजच्या या विसाव्या शतकात अनेक टेक्नॉलॉजी शोधण्यात आल्या आणि त्या आपल्या आजच्या गरजा बनल्या. तसेच काहीसे खरेदी करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल घडून आले. तंत्रज्ञानानुसार पेमेंट करण्याची पद्धतही बदलत गेली आणि त्याचे विविध मार्ग किंवा प्लॅटफॉम तयार झाले. त्या माध्यमात मग डेबिट- क्रेडिट कार्ड आले ज्यांनी एखाद्या बिलाची रक्कम कार्डाद्वारे देणे सोपे झाले. त्याचबरोबर काही वर्षांपासून मोबाईल पॉईंट ऑफ सेल्स मशीन सुद्धा उदयास आली. ही बर्‍याच काळापासून अस्तित्वात आहे.. परंतु मोबाइल वॉलेट ही एक संपूर्णतः नवीन संकल्पना आहे, जी कार्डच्या वापराला मागे टाकत आहे. यामुळे हळूहळू पारंपारिक पेमेंट पद्धती बदलू लागली आहे. यातच आता कोरोनाच्या जगभरातील संसर्गामुळे कॅश पेमेंट तसेच कार्ड पेमेंट्स खूप कमी झाले आहेत, तर आता ई-वॉलेट सर्व्हिस म्हणजेच ऑनलाईन पेमेंट ट्रांझॅक्शन वाढले आहे..


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


डिजिटल वॉलेट्स, ई-वॉलेट्स आणि मोबाईल वॉलेट्स अशा काही सेवांमुळे कॅशलेस व्यवहार सुलभ झाले आहेत. गेल्या ४-५ वर्षात मोदी सरकारच्या ‘कॅशलेस इंडिया’ या उपक्रमामुळे याचा वापर अधिक वाढला आहे. आता आपण आपले पैसे डिजिटल वॉलेट्स मध्ये ठेवू शकता, म्हणजे बँकेचं खातं या वॉलेटशी जोडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुद्धा आर्थिक व्यवहार करता येतात...

मोबाईल वॉलेट म्हणजे सोप्या भाषेत व्हर्च्युअल मोबाइल वॉलेट आहे जिथे एखाद्या मोबाइलमध्ये ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आपण रक्कम ठेवू शकतो. भारतात विविध प्रकारचे मोबाइल वॉलेट्स आहेत जसे की ओपन, सेमी-ओपन, हाल्फ क्लोज आणि क्लोज असे जे वापरण्याच्या प्रकारावर आणि पेमेंटवर अवलंबून आहेत. ई- वॉलेट्सचा वापर वेगाने वाढत आहेत कारण ते व्यवहाराची गती वाढविण्यास मदत करतात, विशेषत: ई-कॉमर्स कंपन्यांसाठी आणि सर्व ई-कॉमर्स मार्केटमध्ये अशा मोबाइल वॉलेट्ससह पेमेंट केले जात आहे.

चला तर जाणून घेऊयात भारतात कोणत्या मोठ्या ई-वॉलेट कंपन्या कार्यरत आहेत.. 

१) पेटीएम (Paytm): 

पेटीएम हे भारतातील सर्वात मोठे ई-वॉलेट मोबाइल कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, जे आपल्या ग्राहकांना पैसे साठविण्यासाठी आणि त्वरित पैसे भरण्यासाठी डिजिटल वॉलेटची ऑफर देतात. ही भारतातील डिजिटल पेमेंट करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.

२०१० मध्ये लाँच केलेले पेटीएम सेमी-बंद मॉडेलवर काम करते आणि ज्याचे मोबाइल मार्केट आहे, जेथे ग्राहक पैसे त्यांच्या पेटीएम वॉलेटमध्ये ठेवू शकतात आणि ज्या कंपनीला ऑपरेशनल टाय-अप आहेत अशा व्यापार्‍यांना पैसे पाठवू शकतात मग त्यात आता अनेक किरकोळ दुकानदार, शॉपिंग मॉल्स, किराणा, कपडे शॉप्सचा ही समावेश आहे. 

ई-कॉमर्स व्यवहार करण्या व्यतिरिक्त पेटीएम वॉलेटचा वापर बिल पेमेंट करण्यासाठी, पैसे इतरांना पाठविण्यासाठी आणि प्रवास, करमणूक आणि किरकोळ उद्योगातील व्यापार्‍यांकडील सेवा मिळविण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. आतापर्यंत भारतात १० कोटींहून अधिक लोकांनी याचा वापर केला आहे. 


२) गूगल पे (Google Pay): 

ही ई-वॉलेट सेवा गूगल इकोसिस्टमचा एक भाग म्हणून ओळखली जाते. त्यांनी या मार्केट मध्ये उशीरा प्रवेश केला परंतु, त्यांचा युजर्स बेस जास्त असल्यामुळे त्यांनी मार्केटमध्ये त्वरित वर्चस्व मिळविलं. गूगल पेद्वारे आपण मित्रांना पैसे पाठवू शकतात, बिले भरू शकतात आणि ऑनलाइन खरेदी करू शकतात, आपला फोन रिचार्ज करू शकतात. 

गूगल पे आपल्या अधिकृत बँक खात्यासह कार्य करीत आहे, याचा अर्थ आपले पैसे आपल्या बँकेत सुरक्षित असते. वॉलेट्स रीलोड करण्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि आपल्याला अतिरिक्त KYC करण्याची आवश्यकता नाही. जी इतर सर्व अ‍ॅप्ससाठी आवश्यक आहे. आतापर्यंत भारतात १० कोटींहून अधिक लोकांनी याचा वापर केला आहे.

 

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


३) भीम (BHIM UPI): 

भीम अ‍ॅक्सिस पे एक यूपीआय बँकिंग अ‍ॅप आहे ज्यात आपल्‍याला इतर ई- वॉलेटसारखे फक्त स्मार्टफोनद्वारे त्वरित पैसे पाठवता येतात. थेट अ‍ॅपमधून आपण प्रीपेड मोबाइल आणि डीटीएच सेट-टॉप बॉक्सवर इत्यादी ऑनलाइन रिचार्ज करू शकतो. 


४) फोन-पे (PhonePe): 

२०१५ मध्ये 'फोन-पे'ची सुरुवात झाली आणि अवघ्या ४ वर्षात ते १० कोटींहून जास्त डाउनलोडचा मार्क ओलांडण्यात यशस्वी झाले. फोनपे हे युपीआय (UPI) वर आधारित चालते. फोनपे ॲपद्वारे युपीआय वापरून पेमेंट करता येते, तसेच फोनपे-ईवॉलेट वापरून ही पेमेंट्स किंवा व्यवहार करता येतात. क्यू-आर कोड पेमेंट्सपासून ते डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरूनही पेमेंट करता येते. 

फोनपे द्वारे बिल भरणे, पैसे पाठवणे सोपे जाते व आकर्षक कॅशबॅक ऑफर्सही मिळतात. फोनपेमध्ये आपण दिलेली माहिती सुरक्षित असते. फोनपे चे मोबाइल ॲप्लिकेशन इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा भारतातील सर्वात सुरक्षित आणि वेगवान ऑनलाइन पेमेंटचा पर्याय आहे. 


५) अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay): 

अ‍ॅमेझॉन पे ही एक ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया सेवा आहे जी अ‍ॅमेझॉनच्या मालकीची आहे. २०१० मध्ये जागतिक पातळीवर आणि भारतात २०१५ मध्ये लॉन्च करण्यात आली. 'अ‍ॅमेझॉन पे' ने अ‍ॅमेझॉनचा ग्राहक तळ वापरला आहे आणि बिगबाजार इत्यादी सह आपल्या अ‍ॅमेझॉन खात्यांमधून वेबसाइटवर पैसे देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 

'अ‍ॅमेझॉन पे' ने ही आपल्या प्लॅटफॉर्मवर विना-किंमत ईएमआय पेमेंट पर्याय सक्षम करण्यासाठी झेस्टमनी सारख्या कंपन्यांशी करार केला आहे. यामुळे ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवर उत्पादने खरेदी करणे आणि परवडणार्‍या हप्त्यांद्वारे पैसे देणे सोपे होत आहे. 

तर या लॉकडाऊनच्या काळात आणि लॉकडाऊनच्यानंतर सुद्धा या डिजिटल वॉलेट्स, ई-वॉलेट्स आणि मोबाईल वॉलेट्स सर्व्हिसेसचा वापर करून आपले व्यवहार आपण सुरक्षित ठेऊ शकतो.