एका यशस्वी उद्योजकाचे 'हे' गुण तुमच्यात आहेत का?

एका यशस्वी उद्योजकाचे 'हे' गुण तुमच्यात आहेत का?


अनेक जण उद्योजक बनण्याचे स्वप्न घेऊन त्या दिशेला वाटचाल करतात. पण उद्योजक बनणे, व्यवसाय सुरु करणे व तो यशस्वीरीत्या चालवणे हे काही सोपे काम नाही.. अनेक उद्योग अपयशी होतात, अनेक उद्योजक आपला बिझनेस यशस्वी करण्यात अपयशी ठरतात...
याचे मुख्य कारण त्यांना व्यवसाय कसा चालवायचा हे माहित नसते. अनेकांना ते माहिती असले तरीही व्यक्तिगत पातळीवर त्यांना यशस्वीरीत्या बिझनेस चालवता येत नाही. कारण त्यांच्यात एक यशस्वी उद्योजक बनण्याचे गुण नसतात. पण जर निरीक्षण केले तर यशस्वी उद्योजकांमध्ये आपल्याला अनेक गोष्टी सारख्या दिसून येतात...
ते आशावादी आणि आत्मविश्वासू असतात. ते स्वत: अतिशय शिस्तबद्ध असतात. नवनवीन आयडीयाज साठी अशा व्यक्ती नेहमी तयार असतात.
एक यशस्वी उद्योजक बनण्यासाठी प्रत्येकाला काही नियम पाळावे लागतात. त्यांच्याकडे काही वैशिष्ट्ये असतात, त्यांच्यात काही गुण असतात. तर ते गुण किंवा वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आज आपण बघूया..


१) शिस्तबद्धता:
अशा व्यक्ती स्वतःचा बिझनेस यशस्वी रित्या चालण्यावर लक्ष केंद्रित करतात. शिवाय त्यांच्या यशाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक समस्या किंवा अडथळ्यांना ते दूर करतात. त्यांच्याकडे आधीच उत्तमोत्तम स्ट्रॅटेजीस आणि प्रत्येक आयडिया अंमलात आणण्याची रूपरेषा तयार असते. यशस्वी उद्योजक अतिशय शिस्तबद्ध असतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते.


२) आत्मविश्वास:
एक यशस्वी उद्योजक कधीच मी यशस्वी होणार का किंवा मी यशस्वी होण्यासाठी पात्र ठरेल का या गोष्टींचा विचार करत नाही. त्यांच्याकडे असणाऱ्या ज्ञानाने बिझनेस यशस्वी करण्याचा आत्मविश्वास त्यांच्याकडे असतो. या आत्मविश्वासाचा वापर ते बिझनेस साठी करणाऱ्या प्रत्येक कामासाठी करतात.


३) मोकळी विचारवृत्ती:
प्रत्येक घटना आणि परिस्थिती ही व्यवसायाची संधी असते हे यशस्वी उद्योजकांना समजते. कार्यप्रवाह आणि कार्यक्षमता, लोकांमधील कौशल्य आणि संभाव्य नवीन व्यवसाय याबद्दल सतत नवनवीन कल्पना त्यांना सुचत असतात. सभोवतालच्या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष देण्याची क्षमता त्यांच्यात असते.


४) सेल्फ स्टार्टर:
एका यशस्वी उद्योजकाला माहित आहे की जर काही करणे आवश्यक असेल तर त्यांनी ते स्वतः सुरू करायला हवे. ते यासाठी पॅरामीटर्स सेट करतात आणि प्रोजेक्ट त्या मार्गावर असल्याचे सुनिश्चित करतात. ते सक्रिय असतात, परवानगी मिळण्याची प्रतीक्षा ते करीत नाही.


५) स्पर्धात्मक:
बर्‍याच कंपन्या उभारल्या जातात कारण उद्योजकाला माहित असते की ते दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेने अधिक चांगले काम करू शकतात. ते नेहमीच बिझनेसच्या या मार्केट मध्ये स्पर्धात्मक राहतात. त्यांचा सुरु केलेला बिझनेस इतर बिझनेसच्या स्पर्धेत जिंकवण्यासाठी त्यांना नेहमी तयार राहावे लागते.


६) क्रिएटिव्हिटी:
एका यशस्वी उद्योजकाने नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी उद्योजक क्रिएटिव्ह असणे महत्वाचे असते. उद्योजकाकडे बिझनेस मध्ये येणाऱ्या सर्व समस्यांचे सोल्युशन असावे लागते. निदान त्याबद्दल विचार करण्याची त्यांची क्षमता असायला हवी.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


७) निर्धार:
यशस्वी उद्योजक पराभवामुळे खचून जात नाहीत. ते पराभवाकडे यशाची संधी म्हणून पाहतात. पुन्हा यशस्वी होण्यासाठी ते निर्धार करतात. आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. कोणतीही गोष्ट अशक्य आहे याकडे यशस्वी उद्योजक लक्ष देत नाही. त्यांच्यासाठी सर्व गोष्टी शक्य असतात. आणि त्यासाठी ते अतोनात प्रयत्न करण्यास सुद्धा तयार असतात.


८) शक्तिशाली लोकांची कौशल्ये:
उद्योजकाकडे आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी आणि आपल्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य असले पाहिजे. अनेक यशस्वी उद्योजकांना माहिती असते की आपल्या कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे प्रेरणा द्यावी जेणे करून आपला व्यवसाय अधिक पटीने वाढेल. हे कौशल्य प्रत्येक उद्योजकाकडे असते.


९) कार्य करण्याची क्षमता:
यशस्वी उद्योजक हे सर्वात पहिले ऑफिस मध्ये येणारे व सर्वात शेवटी ऑफिस मधून निघणारे हवेत. काम असेल तेव्हा सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करण्याची उद्योजकाची क्षमता असावी लागते. कोणत्याही जागेवर असतील तरीही त्यांचे मन नेहमी कामात गुंतलेले असते.


१०) आवड:
एका यशस्वी उद्योजकांमध्ये कोणत्याही गोष्टीची आवड असणे हे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यांना त्यांच्या कामाप्रती प्रेम असले पाहिजे. बिझनेस यशस्वी करण्यासाठी अधिक वेळ त्यांनी काम कारले पाहिजे, कारण पैशांपेक्षा कामातून त्यांना जास्त आनंद मिळतो. एक यशस्वी उद्योजक त्याचा बिझनेस मोठा करण्यासाठी कायकाय करावे लागेल याबद्दल नेहमी वाचत असतो किंवा यावर रिसर्च करत असतो.