एक यशस्वी बांधकाम उद्योजक - बी. जी. शिर्के!

एक यशस्वी बांधकाम उद्योजक - बी. जी. शिर्के!


पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलाचे शिल्पकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ उद्योगपती बी. जी. शिर्के यांची वेगळी कोणती ओळख सांगणे चुकीचे ठरेल.. 

बाबूराव गोविंदराव शिर्के हे भारतातील एक मराठी उद्योजक असून ते बिल्डर होते..  साताऱ्यातील एका शेतकरी कुटुंबात १ ऑगस्ट १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची परंपरा नसलेल्या घरात जन्मलेल्या शिर्के यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती... 


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


लहानपणापासूनच त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे घरातून शिक्षणासाठी पैसे मिळाले नाही... परंतु शिक्षणाची आवड असलेल्या शिर्के यांनी 'कमवा आणि शिका' या सरकारच्या योजनेचा लाभ घेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले... 

१९४३ मध्ये पुण्यातील 'गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग' मधून ते सिव्हील इंजिनिअर झाले. वाई-पसरणी परिसरातील पहिला सिव्हील इंजिनिअर होण्याचा मान पटकावणा-या शिर्के यांनी शिक्षण पूर्ण होताच एक वर्षाच्या आत उद्योग क्षेत्रात प्रवेश केला...
त्यांनी १९४४ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी 'सुप्रीम कन्स्ट्रक्शन' नावाची कंपनी सुरू केली. १९४४ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती केली. १९४५ साली कोल्हापूर कारागृहाच्या बांधकामाचे मोठे कंत्राट त्यांना मिळाले... 


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


त्याच सुमारास इ.स. १९४७ साली वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी त्यांनी विजया शिंदे यांच्याशी लग्न केले. त्यांच्या पत्नीने त्यांना उद्योगात वेळप्रसंगी सल्ले देऊन उद्योगाच्या उभारणीस हातभार लावला. सिपोरेक्स कंपनीच्या उभारणीमध्ये सौ. शिर्के यांचा मोठा सहभाग होता. इ.स. १९५३ सालापर्यंत पुणे युनिव्हर्सिटी मधील केमिस्ट्री डिपार्टमेंटची पहिली मोठी इमारत, वीरचे धरण अशी अनेक कामे त्यांनी केली. या सुमारास त्यांचा व्यवसाय स्थिरावला होता.
शिर्के उद्योग समुहाचे संस्थापक बाबुराव गोविंदराव शिर्के यांनी अनेक अवाढव्य प्रकल्प उभारले. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी शिर्के समुहाला एक आंतरराष्ट्रीय किर्तीचा उद्योगसमुह म्हणून विकसित केले. पुण्याच्या बालेवाडी क्रीडासंकुलाचे शिल्पकार, दुबईतील अनेक मशिदी आणि वसाहतींचे निर्माते, नवी मुंबई प्रकल्पातील एक प्रमुख विकासक म्हणून शिर्के यांची ओळख होती...


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


किर्लोस्कर समुहाच्या अनेक प्रकल्पात सहभागी झालेल्या शिर्के यांनी मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वांद्रे-कुर्ला संकुलातील स्पोर्टस कॉम्प्लेक्स, हिंजवडी आयटी पार्क, चेन्नईतील विप्रो आयटी पार्क यासह देशाविदेशात अनेक मोठ्या प्रकल्पांचे बांधकाम केले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये अनेक सरकारी प्रकल्प शिर्के उद्योग समुहाने बांधले. सामाजिक जाणिवेतून शिर्के यांनी कंपनीच्या उत्पन्नातूनच गरिबांसाठी दर्जेदार घरे बांधली आहेत...
कोणाचीही मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर शिर्के यांनी स्वतःचा बिझनेस मोठा करून यशस्वी करून दाखवला. आपल्यासाठी बी.जी.शिर्के एक उत्तम उदाहरण आहेत...