शंतनुराव किर्लोस्कर महाराष्ट्राचे उद्योगमहर्षी (1903 - 1994)

शंतनुराव किर्लोस्कर महाराष्ट्राचे उद्योगमहर्षी (1903 - 1994)


किर्लोस्कर ब्रँडला कोणी ओळखत नाही असा व्यक्ती आज महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. इ.स. 1888 साली लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर ब्रदर्स लि. नावाची कंपनी उभारली आणि या कंपनीला आज यशाच्या शिखरावर त्यांच्या मुलाने - शंतनुराव किर्लोस्कर यांनी पोहचवले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते... 

10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


शंतनुराव किर्लोस्कर यांना महाराष्ट्रातच काय पण संपूर्ण जगभरात त्यांच्या व्यवसायातील कामगिरीमुळे ओळखले जाते. महाराष्ट्राचा औद्यागिक विकास साधणारे उद्योगमहर्षी अशी त्यांची प्रचिती आहे..
हे किर्लोस्करवाडी येथील प्रसिद्ध उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे चिरंजीव होते. कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पत्नी सौ. यमूताई मुलगे चंद्रकांत व श्रीकांत मुलगी सरोजिनी असा त्यांचा परिवार आहे. वडिलांप्रमाणेच लहानपणापासून यंत्रनिर्मितीमध्ये ते रममाण असायचे..
शंतनुरावांनी भारतात बीएससीचे शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेमध्ये मॅसेच्युसेट्स येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीचे अधिक शिक्षण घेतले. मोठ्या पगाराच्या परदेशी नोकरीच्या जाळ्यात न अडकता आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शंतनुराव आपल्या मायदेशी परतले... 

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

 
अमेरिकेतून शिक्षण घेऊन आल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी कामगारांसमवेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. घराची आणि व्यवसायाची जबाबदारी शंतनुरावांनी आपल्या खांद्यावर कायम पेलली. मराठी माणूस आणि उद्योग यातील विसंवादाच्या सार्‍या शक्यता मोडून काढत शंतनुरावांनी किर्लोस्कर उद्योगांच्या अनेक शाखा देशात ठिकठिकाणी सुरु केल्या...
त्यांनी 1946 मध्ये पुणे येथे खडकी भागामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन्स व कमिन्स हा इंजीन निर्मितीविषयक कारखाना परदेशी सहकार्याने स्थापन केला. हडपसर येथे किर्लोस्कर ब्रदर्स ही कंपनी स्थापन केली. तसेच पुणे इंडस्ट्रियल हॉटेल (ब्ल्यू डायमंड) सुरू केले. याच वेळी त्यांनी पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज च्या कामामध्ये भाग घेऊन उद्योजकांचे प्रश्‍न भारत सरकारपुढे मांडले. स्वच्छ व सुंदर पुणे ही योजना त्यांनी पुण्यातील शाळांमध्ये रुजविली. पुण्यातील अनेक संस्थांना अर्थसहाय्य केले...
किर्लोस्कर समूहामधील विविध कंपन्यांची नावे पाहिली तरी त्यांच्या यशाचा आलेख सहजच डोळ्यांसमोर उभा राहतो. नांगर तयार करणारा हा उद्योग समूह पुढे यांत्रिक हत्यारे तयार करणारा भारतातला पहिला उद्योग बनला. या उद्योग समूहाने विविध प्रकारची इंजिने यंत्रे तयार करत संगणक तयार करण्यासाठी थेट अमेरिकन कंपनीशी करार केला..

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

 
शंतनुरावांनी केवळ यंत्रांचे उत्पादनच केले असे नाही तर त्यांनी उत्पादन वाढवणार्‍या यांत्रिक आधुनिक शेतीचा प्रसार देखील केला. अनेक प्रदर्शनांतून कार्यशाळांतून छोट्या-मोठ्या सभा-संमेलनांतून त्यांनी शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कोट्यावधी रुपयांचे परदेशी चलन भारतात आणणार्‍या पहिल्या काही उद्योजकांपैकी एक म्हणजे शंतनुराव होत. जर्मनी अमेरिका आफ्रिका व युरोप खंडातील काही देश-आदी देशांशी औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्यात किर्लोस्करांचा सिंहाचा वाटा आहे.. 


त्यांच्या कामगिरीनिमित्त त्यांना पद्मभूषण (1965) सर वॉस्टर पकी प्राइझ (1968) कर्मवीरोत्तम पुरस्कार (1972) वाणिज्यरत्न (1976) सन्मान्य डी. लिट. पुणे विद्यापीठ(1988) पुण्यभूषण (1991) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा केले गेले. 

शंतनुराव केवळ आपल्या समूहाचीच भरभराट करू पाहणारे स्वार्थी उद्योजक नव्हते. ते सामाजिक व सांस्कृतिक आस्था असणारे मराठी माणूस होते. औद्योगिक भारताकडे झालेल्या वाटचालीत शंतनुरावांचा व किर्लोस्कर उद्योग समूहाचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे..