जाणून घ्या लाखोंचा बिझनेस प्लॅन

जाणून घ्या लाखोंचा बिझनेस प्लॅन


ज्यांना नोकरी करण्यापेक्षा बिझनेसमध्ये अधिक इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हा ब्लॉग खूपच फायद्याचा ठरू शकतो. अनेकांना नोकरी करायची नसते, त्यांना स्वतःचे भविष्य बिझनेसमध्ये बघायचे असते, त्यांना बिझनेस करायचा असतो. त्यामुळे हे लोक नेहमीच बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार करतात. तुमच्या बिझनेसमधून लाखो कमावण्यासाठी योग्य प्लॅन बनवणे महत्त्वाचे असते. हाच बिझनेस प्लॅन तुम्हाला तुमचा व्यवसाय योग्य पद्धतीने चालू ठेवण्यासाठी आणि त्यातून नफा मिळवण्यासाठी उपयोगी ठरतो... 

10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


बिझनेस चालू केल्यावर अवघ्या ५ वर्षांत बिझनेस यशस्वी करून दाखवता येतो. ५ वर्षांच्या आत बिझनेस मधून लाखो-करोडोंचा नफा कमावता येतो. तर बघुयात ते कसे शक्य होते.. 


वर्ष १ले  २रे 
जेव्हा आपण बिझनेस सुरु करण्याचा विचार करतो तेव्हा पासून १ २ वर्षांपर्यंत हा बिझनेस योग्य पद्धतीने उभा करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. याच १ २ वर्षात बिझनेस कसा चालेल किंवा तो किती यशस्वी होईल याची कल्पना मिळते. यावेळेचं आपल्याला अधिक मेहनतीची आवश्यकता असते. आपल्या बिझनेस साठी जेवढी मेहनत घेता येईल तेवढी या १ २ वर्षांत घ्यावी. बिझनेससाठी आवश्यक असणारी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावी. बिझनेस साठी आवश्यक असणारे नेटवर्क बनवावे. तसेच या १ २ वर्षात कोणत्याही पद्धतीचा नफा मिळेल याची अपेक्षा करू नये. कारण आपल्या बिझनेसची बाजारात एक प्रतिमा निर्माण करण्याचा हा काळ असतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस कसा पोहोचेल याबद्दल विचार करावा. 


वर्ष ३रे 
बिझनेसची ओळख निर्माण झाल्यावर तुमची सर्व्हिस देणे चालू करा. सुरुवातीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षात तुम्हाला मिळालेल्या निकालांवर तुमच्या बिझनेसची सेवा देणे सुरु करा.  तुमची सेवा न उत्पादन अजून कसे चांगले होऊ शकते याकडे लक्ष द्या. लोकांपर्यंत ते पोहोचले पाहिजे याची काळजी घ्या. पहिल्या-दुसऱ्या वर्षांत तुम्ही निर्माण केलेल्या ओळखीने तुमचा बिझनेस वाढवण्याकडे भर द्या. 


वर्ष ४ थे 
बिझनेस निर्माण झाल्यांनतर व त्याची बाजारात ओळख तयार झाल्यावर तुमच्याकडे क्लाएंट्स येणे सुरु होतील. त्या क्लाएंट्सना योग्य सेवा व उत्पादने द्या. त्यांच्या तक्रारी जाणून घ्या. त्यांच्या समस्या सोडवा. तुम्हाला तुमचा बिझनेस लोकांपर्यंत घेऊन जायचा असेल तर लोकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक द्या. बिझनेस कसा वाढेल याकडे पूर्णपणे लक्ष द्या. निर्माण केलेल्या नेटवर्कचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि आणखी ओळखी निर्माण करा जेणे करून तुमचे क्लाएंट्स वाढतील. 

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


वर्ष ५ वे 
आता तुम्हाला बिझनेस मोठा करण्यासोबतच कमाई कडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. बिझनेस सुरू करून ४ वर्ष होऊन गेल्यावर सुद्धा नफा कमी असेल तर त्याकडे भर द्यावा. जास्तीत जास्त नफा कसा कमावता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे. नव्या नेटवर्क्स मधून जास्तीत जास्त कमाई कशी होईल व त्यातून लॉंग टर्म वॅल्यू कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावा. लॉंग टर्म क्लाएंट्स मिळवावे आणि ते टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.