30 कंपन्यांनी नाकारलेले जॅक मा आहेत चीनमधील श्रीमंत बिझनेसमन!

30 कंपन्यांनी नाकारलेले जॅक मा आहेत चीनमधील श्रीमंत बिझनेसमन!

उद्योजकांनो आणि बिझनेसमन बनण्याची इच्छा असणा-या तरुणांनो... आयुष्यात एकदातरी अपयशी व्हाच... होय, मी जे वाक्य बोललो त्यावर मी ठाम आहे! आपण आज याच विषयावर अधिक माहिती घेऊयात. आपल्या जीवनात अपयशाचे महत्त्व काय आहे, ते जाणून घ्या.

मित्रांनो, जीवनात आपल्या पदरी अनेक वेळा अपयश आले असेल. विद्यार्थीदशेत, नोकरी, बिझनेस किंवा वैयक्तिक आयुष्य असेल... आपल्या कधीना कधी छोट्या-मोठ्या प्रमाणावर अपयश आले असेलच... अपयश झालात… ठीक आहे... It's Totally Fine!!!


जर आपल्याला नोकरी, धंद्यात अपयश आलं ठिक आहे, हा प्रसंग म्हणजे शेवट तर नाही ना??? पुन्हा उठून उभं रहा एका थोर विचारवंताने लिहून ठेवलं आहे  Rise like a phoenix from the ashes... जसा फिनिक्स पक्षी आकाशात उंच भरारी मारतो तसं तुमच्या अपयशांवर मात करा...

याबद्दल एक उदाहरण पाहू यात...

चायनीज उद्योजक जॅक मा आपणासर्वांनाच ठाऊक असतील. जॅक मा हे 'अलिबाबा' या जगातील सर्वात मोठ्या  e-commerce, retail कंपनीचे फाऊंडर आहेत... पण तुम्हाला माहीत आहे का जॅक यांचे अपयश... 

जॅक यांना नोकरी देण्यासाठी ३० हून अधिक कंपन्यांनी नकार दिला म्हणजे त्यांचे जॉब अप्लिकेशन रिजेक्ट केले गेले, त्यातली एक कंपनी केएफसीसुद्धा होती.

जॅक यांना हारवर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठाने १० वेळा नाकारले होते.

तसेच शाळा-कॉलेजमधील अगणिक परिक्षेत असंख्यवेळा जॅक नापास झाले होते...

हे आहे खरं अपयश... जॅक यांना जीवनातील प्रत्येक क्षणी अपयश आले पण ते थांबले नाही, त्यांनी कर्म करण्यावर सातत्यपूर्ण भर दिला. मित्रांनो, सातत्य हा शब्द मी मुद्दामून वापरला आहे. कारण आपल्या कामामधील सातत्यच आपल्या यशापर्यंत घेऊन जाते.


हेच जॅक मा यांच्याबाबतील घडलं आज ते चीन आणि जगातील महत्त्वपूर्ण अशा 'अलिबाबा' कंपनीचे संस्थापक आहेत. आणि त्यांची नेट वर्थ 3,900 करोड अमेरिकन डॉलर एवढी आहे. ते काही वर्षे आशियातील प्रथम क्रमांकाचे श्रीमंत बिझनेसमनसुद्धा होते.
 
म्हणूनच मित्रांनो... आयुष्यात एकदातरी अपयशी व्हाच... तेव्हाच यश मिळवण्यासाठी आपण सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतो आणि अपयशानंतर कमविलेल्या यशाची मजा काही औरच असते. आणि ती तुम्ही स्वतः अनुभवाल!