
मित्रांनो, भारतातील नं. मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या सेमिनार आणि सेशनमध्ये अनेक मराठी उद्योजक आणि होतकरु तरुण बिझनेसमन्स सेल्सबाबत विविध प्रश्न विचारतात. त्यामधील महत्त्वाच प्रश्न म्हणजे प्रोडक्ट / सेवांची विक्री होत नाही काय करु??? आज आपला ब्लॉग या विषयावर आधारित आहे.
सर्वात मोठा आणि गहन प्रश्नाचे उत्तर आज आपण समजून घेऊयात...
मित्रांनो, बिझनेसमध्ये लाखो-करोडोंचा सेल्स करण्याचे एकच रहस्य आहे आणि ते म्हणजे व्हॅल्यू तयार करा...
तुम्ही ग्राहकांना कितपत व्हॅल्यू देता यावर समोरील ग्राहक प्रोडक्ट / सेवा खरेदी करणार की नाही, हे ठरते...
आता आपण पाहुयात सेल्स वाढविण्यासाठी व्हॅल्यू कशाप्रकारे काम करते. यासाठी आपण दोन सेल्समनचे उदाहरण पाहू यात...
त्यांना आपण सेल्समन ए आणि सेल्समन बी अशी नावं दिली आहेत...
सेल्समन ए जेव्हा फिल्डवर जातो तेव्हा संभाव्य ग्राहकाला प्रोडक्ट / सेवा विक्री करण्यापूर्वी त्याला प्रोडक्ट आणि सेवांबाबत फ्री व्हिडीओज, फ्री इबुक्स, फ्री टिप्स देतो. त्यानंतर सेल्समन प्रोडक्ट / सेवा ग्राहकासमोर सादर करतो.
याउलट सेल्समन बी संभाव्य ग्राहकाला थेट सेल्स पिच करतो... सेल्समन त्या ग्राहकाला प्रोडक्ट / सेवांचे फायदे व तोटे सांगून भंडावून सोडतो. त्यानंतर प्रोडक्ट लॉन्च करतो...
तुम्हाला एक प्रश्न विचारतो... कोणता सेल्समनचा जिंकू शकतो... कोणता सेल्समन ग्राहकाला जास्त व्हॅल्यू देतो???
तुमचंही उत्तर सेल्समन ए असेच असेल...
सेल्समन ए ग्राहकांना व्हॅल्यू देऊन विश्वास निर्माण करतो आणि एकदा का तुम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन केला की ग्राहक तुमच्याकडूनच प्रोडक्ट / सेवा विकत घेणार...
हेच आहे लाखो-करोडोंचा सेल्स होण्याचे एकमेव रहस्य!