तुमच्याकडे वेळ नाही हे होऊच शकत नाही...

तुमच्याकडे वेळ नाही हे होऊच शकत नाही...

मित्रांनो, आपल्या ऑफिसमधील सहकारी किंवा घरातील मंडळी कोणतेही कामं करायला सांगतात आणि आपण त्यांना म्हणतो माझ्याकडे आजिबात वेळ नाही... किंवा हे काम मी नंतर करतो... मी तुम्हाला सांगू इच्छितो की, "तुमच्याकडे वेळ नाही हे होऊच शकत नाही..." म्हणूनच आजचा आपला टॉपिक आहे... Time अर्थात वेळ... ते कसं यासाठी वाचा पूर्ण ब्लॉग आणि यातून Time Management शिका...

यासाठी आपण एका साध्या गणिताचा आधार घेऊयात...

मित्रांनो, आपल्या सर्वांकडे एका दिवसाचे 24 तास म्हणजे आठवड्याचे 168 तास असतात... 

यामध्ये आपण कुठल्या कामाला किती तास खर्च करतो, ते आता पाहू यात...

सर्वप्रथम तुमचा सर्वाधिक वेळ कुठे खर्च होतो… आठवड्यातील 48 ते 50 तास ऑफिस / बिझनेस किंवा विद्यार्थी असाल तर शाळा, कॉलेजमध्ये जातात.


आपण अधिकांश लोक शहरात राहतो आणि शहर म्हटलं की ट्रॉफिकची समस्या आलीच. तेव्हा दररोज ऑफिसला ये-जा करण्यासाठी लागणारा ॲव्हरेज वेळ 1.5 तास म्हणजे आठवड्याचे 9 ते 10 तास 

त्यानंतर आठवड्यातील 8 ते 9 तास व्यायाम, चालणे किंवा दुस-या ऍक्टिविटीमध्ये जातात, असे समजू

झोप… प्रत्येक दिवशी सात तासांची झोप म्हणजे आठवड्याचे झाले 49 तास...

आता तुम्ही काम, व्यायाम, जेवण आणि झोप यासाठी लागणा-या वेळेची बेरीज केली तर उत्तर येते 118 तास..


म्हणजे आठवड्याच्या 168 तासांपैकी आपण फक्त 118 तासच योग्यरित्या खर्च करतो. याचाच अर्थ आपल्याकडे 50 तास बाकी उरतात. म्हणजेच दर दिवशी तुमच्याकडे सरासरी सात तासांचा राखीव अवधी उरतो.

या उरलेल्या 50 तासात आपण भरपूर काय करु शकतो, तुमची प्रोफाईल बिल्ड करा, क्म्युनिकेशन वाढवा, बिझनेस किंवा मार्केटबद्दल शिका, नवा एखादा कोर्स करा... मित्रांनो, जीवनात यशस्वी होण्यासाठी याच 50 तासांचा सदुपयोग आपण केला पाहिजे... तरच आपण इतरांपेक्षा वेग़ळे ठरू... 

म्हणूनच मी म्हणतो तुमच्याकडे वेळ नाही हे होऊच शकत नाही... आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि हा 50 तासांचा वेळ वाया घालवू नका त्याचा योग्यप्रकारे आपल्या भविष्यासाठी उपयोग करा... Don’t waste your own time, use it wisely!