वाचा बिझनेससाठी कर्ज कसे मिळवायचे...

वाचा बिझनेससाठी कर्ज कसे मिळवायचे...

उद्योजकांनी बिझनेस सुरु करण्यासाठी किंवा बिझनेसमध्ये वाढ करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घ्यावे, असे सर्व सांगतात. पण बिझनेस कर्ज कसे मिळवायचे... याचबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. यासाठी वाचा पूर्ण ब्लॉग.


 जेव्हा तुम्ही बॅंकेकडे लोनसाठी अर्ज करता तेव्हा बॅंक मॅनेजर तुम्हाला लोन रिपोर्ट सबमिट करायला सांगतो. या लोन रिपोर्टमध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेसची इत्यंभूत माहिती द्यायची असते. तो रिपोर्ट अथ ते इति कसा तयार करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे.


1. Introductory Page - सर्वप्रथम तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुमचा परिचय द्यावा लागेल आणि प्रोजेक्ट कशा कारणासाठी आहे, ते लिहावे. उदाः नवा बिझनेस सुरु करायचाय किंवा बिझनेसमध्ये वाढ करायची आहे, कोणत्या कारणासाठी लोन हवे, त्याची या मुद्यात ओळख करुन द्या.


2. Summary of the project - या मुद्यात प्रोजेक्टची पूर्ण माहिती द्या. तुम्हाला हा प्रोजेक्ट का करायचायं, यामागील तुमचे ध्येय, या प्रोजेक्टकडून तुमच्या अपेक्षा हे सर्व पॉईण्ट्स येथे तुम्ही मांडायला हवेत.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


3. Details about the Businessman - या मद्द्यात बिझनेसमनला किंवा बिझनेस पार्टनर्स (असतील तर) त्यांची पूर्णपणे माहिती मांडावी लागते. त्यांचे शिक्षण, कामाचा अनुभव, व्यवसायाचा अनुभव हे सर्व येथे लिहा.


4. प्रोजेक्ट रिपोर्टच्या चौथ्या मुद्यात बिझनेसमनला त्याच्या बॅंक अकाऊंट्सचे पूर्ण डिटेल्स, बिझनेस प्रोडक्ट किंवा सेवा याबद्दल माहिती देणे अनिवार्य आहे. तसेच तुमचे टार्गेट मार्केट काय असेल याबाबत या मुद्यामध्ये भाष्य करा.


5. प्रोजेक्ट रिपोर्टच्या पुढील पॉईन्ट्समध्ये तुमच्या कंपनीतील कर्मचारी तसेच टॉप मॅनेजमेंटमधील कर्मचारी त्यांचे शिक्षण, कामाचा अनुभव या सर्व बाबी मांडाव्यात. जेणेकरुन तुमचे कर्मचारी तुमचा बिझनेस वाढविण्यास सक्षम आहेत का हे कळेल...


6. प्रोजेक्ट रिपोर्टच्या पुढच्या टप्प्यात तुमच्या बिझनेसमधील Infrastructure facilities, operational premises, महत्त्वाच्या machinery याबद्दल माहिती सखोल माहिती द्या. तुम्हाला जर करोडोंमध्ये कर्ज हव असेल तर बॅंक या सर्व बाबी चेक करते.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


7. तुम्ही तुमच्या बिझनेसमार्फत ज्या सेवा किंवा उत्पादन विकणार आहात त्याचे ग्राहक कोण आहेत, ते मांडा. तुमच्या संभाव्य ग्राहकांबद्दल येथे मत प्रदर्शन करा.


8. तुमच्या बिझनेसमार्फत कोणती कंपनी अक्वायर केली आहे का? तसेच कोणत्या कंपनीसोबत टायअप आहेत का ते सांगा. चांगल्या कंपनीसोबत असलेले टाय अपही मार्केटमधील तुमचे गुडविल वाढवते ते आपल्या लोन मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.


9. प्रोजेक्ट रिपोर्टच्या पाईंटमध्ये तुमच्या बिझनेसला वित्तपुरवठा करणा-यांची माहिती द्या. यामध्ये बॅंक, पतपेढ्या यासारखे अनेक पर्याय असू शकतील, त्यांची माहिती मांडावी.


10. प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये पुढील भाग स्टेटमेंटचा आहे. यात तुम्ही Balance Sheet, Profit and Loss Statements आणि Fund Flow Statement या स्टेटमेंटची जोडणी करावी. याशिवाय तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होणार नाही. जर तुम्हाला बिझनेस लोन हवं असेल हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे.


11. प्रोजेक्ट रिपोर्टच्या शेवटच्या भागात तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचे निष्कर्ष मांडा. बिझनेस लोन का हवे, तुमचा प्रॉफिट रेशो काय? तुम्ही किती वर्षात या कर्जाची परतफेड करणार ते सर्व मांडा.


जर तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दल पॅशन असेल, तुम्हाला तुमच्या बिझनेसचे ज्ञान असेल तर नक्कीच आणि तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट उत्तम असेल तर नक्कीच तुम्हाला लोन देण्यात येईल.