तुमची संपत्ती वाढविणारा Game!!!

तुमची संपत्ती वाढविणारा Game!!!

नमस्कार, उद्योजक आणि बिझनेसमन होण्याची इच्छा असणा-या मराठी तरुणांनो... 'स्नेहलनीती' ब्लॉग सीरिजमधून तुम्ही उद्योजकांच्या प्रेरणादायी स्टोरिज, नवे बिझनेस याबद्दल वाचतच असता. आज आम्ही तुमच्यासाठी एक गेम आणला आहे आणि हा ब्लॉग तुमची संपत्ती वाढवू शकतो म्हणूनच हा ब्लॉग पूर्ण वाचा. अन् तुमची संपत्ती वाढविण्याचा हा Game समजून घ्या...

दररोज वाढणा-या महागाईमुळे आपले सेव्हिंग्सचे गणित बिघडले आहे. अशावेळेस आपली संपत्ती कशी वाढवायची असा प्रश्न 'स्नेहलनीती'च्या सेमिनार आणि सेशन्समध्ये अनेक उद्योजक विचारतात. म्हणूनच आज आपण पाहू यात संपत्ती वाढविण्याचा गेम. याद्वारे नक्की तुमची संपत्ती वाढेल.


लेव्हल १... तुमचे सर्वाधिक पैसे कुठे खर्च होतात म्हणजेच तुमचे बॅड डेब्ट्स ते पहा. अवाजवी खर्च टाळा. महिन्याचे किंवा आठवड्याचे बजेट तयार करा आणि त्या बजेटनुसारच खर्च करण्यावर फोकस करा.

लेव्हल २... तुमची आवड काय आहे ते शोधा त्यानंतर ध्येय ठरवा आणि ते ध्येय मिळविण्याच्या दिशेने कठोर मेहनत करा. या दरम्यान अनेक अडथळे येतील त्यांचा त्याग करा. तुमचा फोकस ध्येयावरच असू द्यात.


लेव्हल ३... तुमच्या संपत्तीचे उत्तमप्रकारे गुंतवणूक करा. सध्या घडीला आपण शेअर्स, पॉलिसी अशा वेगवेगळ्या मोड्समध्ये पैसे गुंतवू शकतो. तसेच तुम्ही एखादा बिझनेस सुरु करू शकता. तुमचा आधीपासून बिझनेस असेल तर एखादा जोड व्यवसाय सुरु करा.

तर मित्रांनो हा आहे संपत्ती वाढविण्याचा गेम. तुम्हीही ट्राय करा नक्कीच तुम्हाला परिणाम जाणवेल.