सॅमसंगने ॲपलला पछाडले; भारतातील सर्वाधिक ग्राहक-केंद्रित ब्रँड यादीत अव्वल...

सॅमसंगने ॲपलला पछाडले; भारतातील सर्वाधिक ग्राहक-केंद्रित ब्रँड यादीत अव्वल...

नमस्कार, उद्योजक आणि बिझनेसमन होण्याची इच्छा असणा-या मराठी तरुणांनो... आज आपण 2019 सालामधील भारतातील सर्वाधिक ग्राहक-केंद्रित ब्रँडबद्दल माहिती घेणार आहोत. 'स्नेहलनीती' ब्लॉग सीरिजमधून तुम्ही उद्योजकांच्या प्रेरणादायी स्टोरिज, नवे बिझनेस याबद्दल वाचतच असता. आज आम्ही मार्केट रिसर्च करुन तुमच्यासाठी नवी माहिती समोर आणली आहे. हा ब्लॉग पूर्ण वाचा आणि तुमचे ब्रॅण्ड देशातील सर्वाधिक ग्राहक-केंद्रित ब्रँड कसा होईल, याबद्दल जाणून घ्या...

सर्वप्रथम जाणून घेऊया Consumer-focused बद्दल... कोणत्या एका संघटनेचा कल ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यात असेल त्यास ग्राहक केंद्रित म्हणजेच Consumer-focused म्हणतात. जर तुम्ही ग्राहक केंद्रित व्यवसाय केला तर तुमचा बिझनेस नक्कीच यशस्वी होईल. म्हणून बिझनेसमध्ये ग्राहक समाधानावर भर दिली जाते.

दरम्यान, TRA च्या एका अभ्यासातून 2019 वर्षी भारतातील सर्वाधिक ग्राहक-केंद्रित ब्रँडची यादी जाहिर करण्यात आली. या यादीत सॅमसंग कंपनीने अव्वल स्थान पटकावले आहे. सॅमसंग कंपनीने सर्वाधिक ग्राहक केंद्रित सेवा दिल्याने त्यांनी हा अव्वल क्रमांक पटकावला आहे.


टाटा मोटर्स दुस-या क्रमांकावर... देशातील सर्वाधिक ग्राहक-केंद्रित ब्रँडच्या यादीत दुसरा क्रमांक टाटा मोटर्स, त्यानंतर ॲपल, हीरो मोटोकॉर्प, आणि नायके असे अनुक्रमे ब्रॅण्डने या यादीत स्थान पटकावले आहे.

सॅमसंग vs ॲपल... आंतरराष्ट्रीय स्तरावर सॅमसंग व ॲपल या कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरु असतेच. दरम्यान, या वेळी सॅमसंगने ॲपलवर मात केली असून देशातील सर्वाधिक ग्राहक-केंद्रित ब्रँडच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ॲपलचे प्रोडक्ट जरी चांगले आणि महागडे असले तरी सॅमसंग कमी पैशात जास्तीत ग्राहक-केंद्रित सेवा पुरवून हे स्थान प्राप्त केले आहे.


अन्य ब्रॅण्ड... टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प आणि नायके या ब्रॅण्ड्सनी राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर उल्लेखनीय काम केले आहे. तसेच ग्राहक समाधान आणि ग्राहक केंद्रित सेवा पुरवल्याने या कंपन्यांनी या महत्त्वपूर्ण यादीत स्थान प्राप्त केले. 

या अभ्यासात 11,000 ब्रॅण्डचा अभ्यास करण्यात आला होता आणो यामधील 500 ब्रॅण्डनेच आपले स्टॅडर्ड सुधारले असून अधिकाधिक लोक यांच्या प्रोडक्ट किंवा सेवाला पसंती दर्शवतात.

मित्रांनो, आज आपण पाहिले ग्राहक समाधान आणि ग्राहक केंद्रित सेवेबद्दल... बिझनेसबद्दल अधिक माहितीसाठी स्नेहलनीती ब्लॉग सीरिजला फॉलो करा.