MobiKwik ॲप, पंजाबी जोडपं आणि कोटींची कंपनी...

MobiKwik ॲप, पंजाबी जोडपं आणि कोटींची कंपनी...

मित्रांनो, सध्याचा जमाना डिजिटल पेमेंट ॲपचा आहे. कोणालाही पैसे देताना आपण विचारतो... "तुझ्याकडे 'अमुक' ॲप आहे का? मी त्यावर तुला पैसे पाठवतो..." असा संवाद दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्रास चालू असतो. दरम्यान, एका जोडप्याने ग्रामीण लोकांना टार्गेट ठेवून 'मोबीक्विक' नावाचा ॲप सुरु केला आणि तो ॲप आज लोकांच्या गरजा पूर्ण करुन करोडो रुपयांची कंपनी म्हणून नावारुपाला आला आहे. आज आपण MobiKwik ची केस स्टडी पाहू यात...

ग्रामीण भाग डिजिटल पेमेंट ॲपपासून वंचित... जगात आणि देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये डिजिटल पेमेंट ॲपची सुविधा सुरु झाली; पण देशाच्या 40 टक्क्यांहून अधिक जनता ग्रामीण भागात राहते. अशावेळेस तेथे डिजिटल पेमेंट ॲपची सुविधा कशी नेणार??? तसेच ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने मोठ-मोठ्या डिजिटल पेमेंट ॲपची ग्रामीण भागात डाळ शिजत नव्हती. कारण मोठ्या ॲपला 4G, 3G नेटवर्क लागते.

समस्तेतून MobiKwik चे निर्माण... ही समस्या बिपिन प्रीत सिंह यांनी ओळखली. यावर तोडगा आणि मोबाइल रिचार्ज पर्यायांमध्ये सुधारणा म्हणून बिपिन सिंह आणि त्यांची पत्नी उपासना टाकु यांनी 2009 साली 'मोबीक्विक' ही वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटवर सर्वप्रथम रिचार्च आणि ऑनलाईन शॉपिंगचे पेमेंट या सुविधा देण्यात आल्या होत्या. 

जोडप्यांची बिझनेस कपलकडे वाटचाल... बिपिन प्रीत सिंह यांनी आयआयटी दिल्ली तर उपासना टाकु यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल आणि दोघांनी आंतरराष्ट्रीय कंपन्यात नोकरी केली होती. उच्च पातळीवर कसे काम चालते, याचे दोघांना उत्तम ज्ञान होते. या दरम्यान दोघांना स्वतः काहीतरी निर्माण करायच होतं. अशातच बिपिन यांनी 250 अमेरिकन डॉलर लावून 'मोबीक्विक' सुरु केले.  

'मोबीक्विक' बनले प्रत्येक भारतीयाचे मोबाइल वॉलेट... हळूहळू कंपनी वाढत गेली, कंपनीत मोठ-मोठ्या गुंतवणूक आणि फंडिंग येत राहिली. 2016 साली मोबीक्विकने स्वतःचे ॲप सुरु केले. यानंतर कंपनीने मोबाइल आणि ऑनलाईन पेमेंट, फोन आणि डीटीएच रिचार्ज, मनी ट्रान्सफर आणि शॉपिंग अशा नव्या सुविधा सुरु केल्या.

दरम्यान, 'मोबीक्विक'कडे 1.5 मिलियन मर्चंट्स आहेत तर 55 मिलियनचा ग्राहक वर्ग आहे. यातून कंपनी कोट्यवधी रुपयांची झाली आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागात 55 मिलियनचा युझर्स असल्याने 'मोबीक्विक' प्रत्येक भारतीयाचे मोबाइल वॉलेट बनले आहे. 

तर मित्रांनो, ही होती बिपिन आणि उपासना या उद्योजक जोडप्यांची कथा... तुम्ही अशाप्रकारचे काम करु शकता आणि तुमचे नावं मोठं करु शकता. बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी ब्लॉग आणि व्हिडीओज पाहण्यासाठी 'स्नेहलनीती'ला फॉलो करा.