
स्नेहलनीती आणि बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांच्याकडून सर्वप्रथम गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा...
‘स्नेहलनीती’च्या बिझनेस सेमिनार आणि सेशन्समध्ये आलेले अनेक मराठी व अमराठी उद्योजक एक प्रश्न हमखास विचारतात. तो म्हणजे यशस्वी जीवनाची सूत्रे काय आहेत??? आपण याचबद्दल माहिती घेणार आहोत. आज आपले नववर्ष म्हणूनच नव्या वर्षाची सुरुवात 'या' सूत्रांनी करा... तुम्ही नक्की यशस्वी व्हाल!
पाहू यात कोणती आहेत ही सूत्रे....
तुमचे स्वप्न पूर्ण करा... जीवनात यशस्वी व्हायचे पहिले सूत्रं म्हणजे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर द्या. तुमचे स्वप्न xyz काहीही असेल ते ध्येय म्हणून ठेवा आणि ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसू नका.
बुद्धिमत्ता वाढविण्यावर भर द्या... यशस्वी व्हायचं असल्यास बुद्धिमत्ता वाढविण्यावर भर द्या. तुम्ही जो व्यवसाय, काम किंवा शिकत असाल त्यात दररोज नवं शिकण्याचा प्रयत्न करा. व्यापार, कंपनी जगतात रोज नवनवे अपडेट येत असतात ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. अशाने तुम्ही प्रवाहाबरोबर राहता आणि तुम्ही कधीच मागे पडत नाही.
असे मित्र शोधा जे तुम्हाला प्रेरणा देतील... जीवनात यशस्वी व्हायचं असल्यास असे मित्र शोधा किंवा अशा मित्रांची मैत्री करा जे तुम्हाला चांगला बिझनेस करण्याची किंवा कामात सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देतील. लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला असे काही व्यक्ती असतील ज्यांना आपले यश पाहवत नाही. तेव्हा अशा लोकांपासून दूर रहा.
आपल्या शरीराची काळजी घ्या... तुमच्या शरीराने साथ दिली तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. आपलं शरीरही एक मशीन आहे. मशीनच जसं मेन्टेन्स करतो तशीच काळजी तुमच्या शरीराची घ्या. व्यायाम आणि रेग्युलर चेक अप करुन तुमचे शरीर निरोगी ठेवा.
चांगलं शिकलात ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा... तुम्ही तुमच्या जीवनात काय चांगल केलं, काय चांगलं शिकलात, यशस्वी कामगिरी दुस-या पिढीपर्यंत पोहोचवत रहा. तुम्हाला मिळालेले ज्ञान दुस-यांपर्यंत पोहोचवा आणि नव्या पीढीकडूनही शिकत रहा.