Franchise बिझनेस करायचायं??? तर ही काळजी नक्की घ्या...

Franchise बिझनेस करायचायं??? तर ही काळजी नक्की घ्या...

मॅकडोनाल्ड, केएफसी, स्टारबक्स, सबवे, पिझ्झा हट, सीसीडी... यामधील एका रेस्टॉरंट चेनमध्ये तुम्ही एकदा तरी गेला असाल आणि काही ना काहीतरी खाल्ले असेल. वरील सर्व रेस्टॉरंटची Franchise Business Module ची मूर्तीमंत उदाहारणे आहेत. कोणत्याही बिझनेसची Franchise घेणे आणि ती चालवणे जगातला सर्वात सोपा बिझनेस मॉडेल आहे.

Franchise Business Module Win-Win-Win या त्रयींवर काम करतात. पहिला Win कस्टमर - ग्राहकांना पैशांच्या बदल्यात सेवा देणे, दुसरा Win Franchise Partner आणि तिसरा Win Franchise Owner. अशाप्रकारे हे Franchise Business Module चालते. बिझनेस जरी सोपा असला तरीही हा बिझनेस कसा करायचा याचे ज्ञान हवेच. म्हणूनच मी तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबळे तुम्हाला Franchise Owner बनण्यापूर्वी ही कोणती काळजी घ्यायची याबाबत माहिती देणार आहे.


खर्च लक्षात घ्याः Franchise Business म्हटलं की मोठ्या रकमेची गुंतवणूक आली. तुम्ही कोणा एकाची सेवा तुमच्या नफ्यासाठी विकत घेत आहात. नक्कीच तो तुमच्याकडून या मोबदल्यात पैसे घेणार... अशावेळेस सदर Franchise ची किंमत किती? तुम्हाला कितीपत नफा अपेक्षित आहे? तुम्हाला नक्की तेवढा नफा मिळेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करा.

तुमचं पॅशन फॉलो कराः कोणतीही Franchise विकत घेण्यापूर्वी किंवा या बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची पॅशन काय आहे ते पहा. जर तुम्हाला खाण्याच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही एका रेस्टॉरंटची Franchise घ्या, लाईट रिफ्रेशमेंट बिझनेसची आवड असेल तर कॉफी स्टोअर Franchise मध्ये गुंतवणूक करा. फॅशन बुटिकमध्ये स्वारस्य असेल तर आमची लिवाना फॅशन बुटिक Franchise आहेच. तुम्ही कॉल करु याबद्दल माहिती घेऊ शकता.

रिस्क घेण्याची क्षमता हवीः बिझनेस म्हणजे रिस्क घेण्याची क्षमता हवीच. Franchise Business ही त्याला अपवाद नाही. Franchise Business चा फायदा असा की, तुम्हाला तयार बिझनेस मिळतो. बिझनेस तयार करण्यासाठी तुम्हाला झगडावे लागत नाही. फक्त तुम्हाला त्याचे मार्केटिंग आणि सेलिंग करता आले पाहिजे. तुमच्या धंद्यात येणारी रिस्क तुम्हाला हाताळता आली पाहिजे.


Franchise चे नियम ध्यानी घ्याः Franchise Business सुरु करण्यापूर्वी त्याचे नियम किंवा करारपत्र योग्यपणे तपासा. तुम्ही भली मोठी गुंतवणूक करणार आहात तेव्हा तुम्हाला सर्व बाबींचे योग्य ज्ञान असणे गरजेचे आहे. प्रत्येक Franchise Business चे वेगवेगळे नियम असतात. तेव्हा प्रोडक्ट आणि पूर्णतः ब्रॅन्डची सुंसगता राखणे गरजेचे आहे. तुम्ही जर नियम पाळत नसाल तर Franchise Business च्या फंद्यात पडूच नका.

तुमचे फायनान्स चेक कराः Franchise Business सुरु करण्यापूर्वी तुम्ही financially strong आहात का ते पहा. हे पाहण्यासाठी एक छोटी पद्धत तुम्हाला सांगतो. net worth statement तयार करा, ॲसेट्स त्यात ऍड करा नंतर लायबिलिटी ऍड करा. दोघांमधील फरक तुमची नेट वर्थ ठरवतो. काही franchisors तुमचं नेट वर्थ पाहून तुम्हाला Franchise द्यायची की नाही हे ठरवतात.

Franchise कशी शोधायचीः अनेक franchisors (मालक) पेपरमध्ये जाहिरात देतात. तसेच तुम्हाला एक विशिष्ट franchise घ्यायची असेल तर तुम्ही थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्हाला franchise business ऑनलाईन शोधायचा असेल तर “franchise opportunities,” किंवा “franchises for sale,” हे शब्द वापरुन तुम्ही सर्च करु शकता.