मुंबईची शान ‘हॉटेल ताज महाल पॅलेस’चे फॅक्ट्स तुम्हाला माहीत आहेत का???

मुंबईची शान ‘हॉटेल ताज महाल पॅलेस’चे फॅक्ट्स तुम्हाला माहीत आहेत का???

'ताज' हा शब्दच ऐकल्यावर राजेशाही थाट आणि ऐतिहासिक वारसा डोळ्यासमोर तरळतो. असाच राजेशाही अंदाज आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे मुंबईमधील हॉटेल ताज महाल पॅलेसला. हे हॉटेल म्हणजे मुंबईकरांची शान आणि अभिमान आहे. या हॉटेलमध्ये सर्वसामान्य मुंबईकर जरी गेला नसेल तरी ते या हॉटेलबद्द्ल माहिती मोठ्या अभिमानाने सांगतात

 

हॉटेल ताज महाल पॅलेस बनवण्यामागे भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी नसरवान्जी टाटा यांची कल्पना होती. ती प्रत्यक्षात अवतरली सन १९०३ साली, तेव्हापासून हे हॉटेल 'टाटा ग्रुपचा' एक अविभाज्य घटक आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासमोर या प्राचीन वास्तूबाबतच्या काही फॅक्ट्स मांडल्या आहेत…

 

अपमानातून 'ताज' निर्माण करण्याची कल्पना... त्यावेळी जमशेदजी टाटा यांनी वॉटसन हॉटेलमध्ये गेले होते; पण वॉटसन हॉटेल हे फक्त Whites म्हणजे ब्रिटिशांसाठी आहे, असे सांगण्यात आले. तेव्हा जमशेदजी यांनी ठरविले स्वतःसाठी आणि देशवासियांना अभिमान होईल, असे हॉटेल निर्माण करायचे.

 

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा


भारतीय वास्तुविशारदांची कमाल… हॉटलचे बांधकाम भारतीय वास्तुविशारद सिताराम वैद्य आणि डी. एन. मिर्झा यांच्याकडून झाले तर हॉटेलचा प्रकल्प ब्रिटिश इंजिनिअर डबल्यू. . चेंबर्स यांनी पूर्ण केला

 

मूर्तिमंत वास्तू… वास्तूविशारदेची एक मूर्तिमंत वास्तू म्हणून नावाजलेले हॉटेल ताज महाल पॅलेस १६ डिसेबर १९०३ रोजी लोकांकरीता खुले करण्यात आले. देशी-विदेशी पर्यटक, राजे-महाराजे, प्रेसिडेंट, कॅप्टन्स आणि सिनेतारे-तारका या हॉटेलला आवर्जून भेट देतात.

 

महायुद्धात हॉटेल झाले हॉस्पिटल... पहिल्या महायुद्धात हॉटेल ताज महाल पॅलेसचे रुपांतर ६०० बेड्स असलेल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये झाले. तेथे हजारो जखमी आणि पीडित व्यक्तींवर उपचार करण्यात आले.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 

 

महाकाय हॉटेल…. हॉटेल ताज महाल पॅलेसमध्ये ,६०० कर्मचारी कार्यरत असून येथे ५६० रुम आहेत तर ४४ राजवाड्यसारखे सुट्स आहेत.

 

मंदीचा कठीण काळ… सुरवातीच्या काळात हॉटेल ताज महाल पॅलेसने चांगली उभारी घेतली; परंतु सन १९९० हा मंदीच्या काळ हॉटेलसाठी परिक्षा पाहणारा काळ होता. या काळातही हॉटेलमध्ये लोकांची ये-जा सुरु होती, हे फक्त जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले

 

फक्त नावावर ब्रॅण्ड मोठा केला.. आपल्याला आठवत असेल की, हॉटेल ताज महाल पॅलेसने कधीच जाहिरात केली नाही. त्यांचा पूर्ण बिझनेस 'वर्ड ऑफ माऊथ'वर चालतो. आजही आंतरराष्ट्रीय पर्यटक राहण्यासाठी हॉटेल ताज महाल पॅलेसलाच पहिली पसंती देतात. यावरुन या हॉटेलची महती समजते...

 

आयफेल टॉवर आणि ताज महालचे स्टील एकच... जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आयफेल टॉवरच्या उभारणीसाठी जे स्टील वापरले तेच स्टील हॉटेल ताज महाल पॅलेसचे घुमट बांधण्यात वापरले गेले.

 

पहिल्यांदा ताजने इम्पोर्टेड वस्तू मागवल्या... हॉटेल ताज महाल पॅलेस हे पहिले हॉटेल आहे ज्यात इम्पोर्टेड वस्तू बसविण्यात आल्या आहेत. उदा. अमेरिकन फॅन्स, जर्मन लिफ्ट्स, तुर्किश बाथ्स... देशातील पहिल्या हॉटेलने या इम्पोर्टेड वस्तू मागविणारे 'ताज' हे पहिले हॉटेल आहे.