Forbes च्या ‘100 ग्रेटेस्ट लिविंग बिझनेस माईंड्स’ यादीत तीन भारतीय!

Forbes च्या ‘100 ग्रेटेस्ट लिविंग बिझनेस माईंड्स’ यादीत तीन भारतीय!

जगभरात तसेच बिझनेस क्षेत्रात Forbes या मासिकाचा दबदबा आहे. प्रत्येक बिझनेसमनचे Forbes या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचे स्वप्न असते. मासिकाची जगभरात असलेली प्रतिष्ठा, बिझनेसमन लोकांशी असलेले संबंधांमुळे या मासिकाला एक वेगळीच उंची व एक वेगळेच वलयं प्राप्त करुन दिले आहे. माध्यमातही Forbes बाबतीत कोणती बातमी आली की आपण ती तितक्याच गंभीरतेने वाचतो. काही दिवसांपूर्वीच एका बातमीने असेच लक्ष ओढावून घेतले. बातमी होती Forbes च्या ‘100 ग्रेटेस्ट लिविंग बिझनेस माईंड्स’ या नव्या यादीत तीन भारतीय बिझनेसमन्सचा समावेश…

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा

या वर्षी Forbes या बायविकली मासिकाला 100 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर मासिकाचे मुख्य संपादक स्टीव्ह फोर्ब्स व संपादक रॅन्डल लेन यांनी ‘100 ग्रेटेस्ट लिविंग बिझनेस माईंड्स’ या नावाने नवी लिस्ट जाहीर केली. या शेकडो बिझनेसमन्सच्या यादीत तीन भारतीय बिझनेसमनचा समावेश झाला आहे. यात टाटाचे सर्वेसर्वा रतन टाटा, अर्सेलॉरमित्तलचे चेअरमन लक्ष्मी मित्तल आणि सन मायक्रोसिस्टीमचे सहसंस्थापक विनोद खोसला या बिझनेसमनचा समावेश केला गेला आहे.

Click here to watch latest motivational videos

“यंदा Forbes ने शंभरी पार केली आहे. म्हणूनच आम्ही अशा 100 व्यक्तींची यादी तयार केली आहे, ज्यांनी आपल्या बिझनेसने तसेच आपल्या विचारांनी जगाला नवी दिशा दाखवली आहे. तसेच भविष्यातील पिढीसाठी ते एक मैलाचा दगड ठरतील,” असे मत Forbes च्या प्रवक्त्याने यावेळी मांडले.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा

तसेच ‘100 ग्रेटेस्ट लिविंग बिझनेस माईंड्स’ या यादीत टाटा, मित्तल आणि खोसला यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, टेड टर्नर, ओपराह विन्फ्री, जॅच वेल्च आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांचा समावेश आहे. या शेकडो बिझनेसमनने आपल्या कल्पना आणि बिझनेस स्टोरीज येथे मांडल्या आहेत. जगभरातील सर्व दिग्ग्जांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचे Forbes या मासिकाने केले आहे.

To register for upcoming seminar click here

दरम्यान, Forbes हे जगविख्यात मासिक 17 सप्टेंबर, 1917 रोजी अमेरिकेत सुरु झाले. बिझनेस पत्रकार बी. सी. फोर्ब्स व त्यांचे सहकारी वॉल्टर ड्रे या दोघांनी बिझनेसला चालना देण्यासाठी हे मासिक सुरु केले होते.