तुमच्या Business साठी डिजीटल मार्केटिंग का महत्त्वाचे आहे!

तुमच्या Business साठी डिजीटल मार्केटिंग का महत्त्वाचे आहे!

पुराण काळापासून व्यवसायाचे Marketing म्हणजेच विपणन केले जाते. उत्पादन किंवा सेवांचे विपणन केल्याशिवाय कोणताही Business पुढे जाणार नाही. म्हणूनच आजकालच्या यशस्वी कंपन्या व Business चे मार्केटिंग विंग फारच कुशल असते. आता तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मार्केटिंगमध्येही नवे आयाम आले आहेत. Digital Marketing हा या मधील एक महत्त्वपूर्ण आणि मैलाचा दगड मानला जातो. म्हणूनच सध्या Digital Marketing ची सर्वत्र चांगलीच बूम पहायला मिळते. घरगुती बिझनेस, मोठ्या कंपन्या ते नवनवे स्टार्टअपमध्ये Digital Marketing ची स्वतंत्र टीम पहायला मिळते. तर पाहुया Digital Marketing आपल्या बिझनेससाठी का महत्त्वाचे आहे ते…

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा

Digital Marketing म्हणजे काय रे भाऊ…

Digital Marketing means, “The marketing of products or services using digital channels to reach consumers. The key objective is to promote brands through various forms of digital media.”

साध्या आणि सोप्या भाषेत म्हणायचं तर आपण पुरविलेल्या सेवा वा उत्पादनं ग्राहकांपर्यंत त्वरीत व सहजतेने पोहचविण्यासाठी त्यांचे डिजीटल चॅनेल्सवर प्रमोशन करणे होय.  

Click here to watch latest motivational videos 

Digital Marketing चे प्रकार…

अनेकांना सोशल मीडिया आणि Digital Marketing हे एकच आहे, असे वाटते. परंतु आपल्या सांगू इच्छितो सोशल मीडिया Digital Marketing मधील एक अंग आहे, असे आपण म्हणू शकतो. Digital Marketing चा सोशल मीडिया रीच वाढविण्यासाठी आपण वापर करु शकतो. आता पाहुयात  Digital Marketing चे प्रकार…

  • सर्च इंजिंग ऑप्टिमायझेशन (SEO) – सर्च इंजिंग ऑप्टिमायझेशनचा वापर करुण आपल्या वेबसाईटवर अधिकाधिक ट्रॅफिक आणू शकतो.
  • पे पर क्लिक (PPC) – ऑनलाईन सेल्समध्ये पे पर क्लिक ही टर्म सर्वाधिक वापरतात. आपण कोणत्याही ऑनलाईन जाहीरातीवर क्लिक केल्यास संबंधितांना ती जाहीरात पोस्ट केल्याचे पैसे मिळतात.
  • पब्लिक रिलेशन (PR) – जनमाध्यमांमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पब्लिक रिलेशन. अनेक मोठ्या कंपन्यामध्ये पीआरची स्वतंत्र टीम असते.
  • सोशल मीडिया मार्केटिंग (SMM) – आपल्या कंपनी किंवा बिझनेसमधील ग्राहकांची उत्तम संबंध प्रस्थापित करणे व टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
  • कॉन्टेन्ट मार्केटिंग – सर्च इंजिंन, सेल्स आणि लिड्सकडून ट्रॅफिक मिळविण्यासाठी कॉन्टेन्ट मार्केटिंगचा उपयोग होतो.
  • इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंग – Digital Marketing मधील हा एक नवा प्रकर आहे. एका विशिष्ट ग्राहकांना टार्गेट करण्यासाठी इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंगचा उपयोग होतो.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा

तर वाचक हो, हे झाले काही Digital Marketing चे प्रकार. याचा उपयोग करुन आपण आपला व्यवसाय किंवा सेवा अनेक ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि ते आपला बिझनेस वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आता महत्त्वाचे म्हणजे बिझनेसमन म्हणून आपण या सर्व गोष्टी करु शकत नाहीत. म्हणून Digital Marketing सेवा पुरविणारी एक एजन्सी अथवा या क्षेत्रातील कुशल व्यक्तीला कंपनीत सामावून घ्यावे.

To register for upcoming seminar click here