वर्किंग क्लाससाठी जेवण पुरवणारा FreshMenu

वर्किंग क्लाससाठी जेवण पुरवणारा FreshMenu

बिझनेस करणारा बिझनेसमन अशी आपल्याकडे व्याख्याच बनली आहे. परंतु, ही व्याख्या आता पूर्णपणे खोडली जात आहे. कारण अनेक बिझनेसवूमन म्हणजेच महिला उद्योजक जगभरात ताठ मानेने व्यवसाय करीत आहे. नुसतेच व्यवसाय करीत नसून त्यातून उत्तम नफा मिळवीत आहेत. यासारखीच नेमकी परिस्थिती आहे स्टार्टअप मध्येही. येथे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिलांना स्टार्टअप्स सुरु केले आणि ते आता बेंचमार्क ठरले आहेत. एका तरुण महिलेने FreshMenu हे स्टार्टअप सुरु केले, घेऊया याबद्दल माहिती…

झिवामे : अंतर्वस्त्र विकून बनविली 270 कोटींची कंपनी!

खाणे म्हणजे आपला जीव की प्राण. आजकाल धकाधकीच्या जीवनात व एककल्ली कुटुंबपद्धतीमुळे आपल्या खाण्यातील रामच निघून गेला आहे. मिळेल त्याने पोट भरायचे, असे काहीसे मत मेट्रोपॉलिटन शहरातील मुला-मुलींचे झाले आहे. बरं दोघंही कामावर असल्याने जेवण कोणी बनवायचा हा प्रश्न! म्हणून मिळेल ते ‘कसंही’ आणि ‘कसलंही’ खाण्याची सवय आपल्याला लागली आहे. तेलकट, तिखट आणि मसालेदार खाण्याने डायबिटीज, ह्रदयविकार अशा अनेक रोगांची लागण तरुण वयातच होते.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा

मेट्रोपॉलिटन शहरातील वर्किंग क्लास मुलं-मुली व जोडप्यांची ही व्यथा समवयस्क असलेल्या रश्मी दगा यांनी ओळखली. आपण आपल्या पिढीला हेल्दी ठेवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, हा प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता. यातूनच त्यांनी FreshMenu या इंटरनेट-फर्स्ट रेस्टॉरन्ट बंगळुरु शहरामध्ये सुरु केले. FreshMenu आपल्याला रेडी टू इट/हीट अशा जेवणाची डिलीव्हरी देण्याचे काम करतो.

Click here to watch latest motivational videos

आजच्या काळाची गरज ओळखत FreshMenu हेल्दी व चविष्ट अशा डिशेस् आपल्या मेन्यूमध्ये ठेवल्या आहेत. तसेच जगभरातील सर्व डिशेसची ऑर्डर आपण येथे देऊ शकतो. मेन्स ॲन्ड साईड्स, हॉल ऑफ फेम, पिझ्झाज, सूप ॲन्ड सलाड्स, क्विक बाईट्स आणि डेझर्ट्स असा मेन्यू FreshMenu ने तयार केला आहे. दिवसातून तीन वेळेस सर्व्हिस देण्या-या या स्टार्टअपने अनेक डिस्काऊन्टही सुरु केले आहेत.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

बंगळुरु या देशातील आयटी शहरात सुरु केलेले FreshMenu हे स्टार्टअप आता देशातील मोठ्या शहरात वसलेले आहे. तसेच येत्या काळात छोट-मोठ्या शहरातही या स्टार्टअपची शाखा सुरु होणार असल्याचे संस्थापिका रश्मी दगा यांनी सांगितले. भविष्यात आपली कंपनी अद्यावत आणि हेल्दी मेन्यूची सेवा पुरविण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही त्या सांगतात.

To register for upcoming seminar click here