'हे' गुण तुमच्यात असतील तर तुमचा जन्म नक्कीच बिझनेस करण्यासाठी झालाय...

'हे' गुण तुमच्यात असतील तर तुमचा जन्म नक्कीच बिझनेस करण्यासाठी झालाय...

बिझनेसमनचे गुण काय??? आपल्यातील उद्योजकीय गुण कसे ओळखायचे??? नोकरी करु की बिझनेस??? असे सर्व प्रश्न बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांच्या सेमिनार आणि सेशन्समध्ये उद्योजक आणि ज्यांना भविष्यात बिझनेस करायचायं असे तरुण मंडळी विचारतात... आजचा आपला विषय हाच आहे. खालील मांडलेले गुण तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही निसंकोचपणे बिझनेसमन व्हा...

तर कोणते आहेत ते गुण... 

तुम्हीच तुमचे बॉस असता... जर तुम्हीच तुमचे बॉस आहात असा विचार तुम्ही करीत आहात तर तुम्ही उद्योजक व्हा. तुम्हाला स्वतःचे नाव, वलय निर्माण करायचयं किंवा तुम्हाला जीवनात मोठं काही करण्याचा विचार असेल तर तुम्ही नक्कीच उद्योजक होण्याचा विचार करा.


बिझनेस कौशल्य... तुमच्या अंगी वेगवेगळे बिझनेस कौशल्य असतील तर तुम्ही नक्कीच बिझनेसमन होण्याच्या विचार करा. Financial management, Marketing, sales and customer service, Communication and negotiation, Leadership हे काही स्कील सेट आहेत. हे गुण तुमच्याकडे असतील तर तुम्ही बिझनेसमन होऊ शकता.

कल्पना अंमलात आणू शकता... जर तुम्ही कल्पनांना योग्य दिशा देऊन त्या अंमलात आणू शकता तर तुमच्यात उद्योजक होण्याची पात्रता आहे. अनेक लोकं नव्या कल्पनांना वाव देतात आणि त्यांना अंमलात आणून कंपनीला मोठा नफा मिळवून देतात. अशाप्रकारे तुम्हीही तुमच्या बिझनेसमध्ये कमालीचा नफा मिळवू शकता.पैसे कमवण्याचे ध्येय... सर्वाधिक पैसे कमविणे हे तुमचे ध्येय असेल तर तुमचा जन्म उद्योजक होण्यासाठीच झाला आहे. मात्र, हे पैसे तुम्ही इमानेतबारे म्हणजेच योग्य मार्गाने म्हणजेच तुमच्या सेवा आणि उत्पादन विकूनच मिळवायला हवे.


सेल्स तुमचा आत्मा आहे... तुमच्या अंगी जर उत्पादन किंवा सेवा विक्री करण्याची पॅशन असेल तर तुम्ही बिझनेसमन नक्कीच होऊ शकता. जो सेल्स करु शकतो तोच सर्वोत्तम बिझनेसमन होऊ शकतो. कारण वाटाघाटी करण्याचे कसब त्याच्याकडे असते.


कॉर्पोरेट शर्यत तुम्हाला आवडत नसेल... ऑफिसमधील गॉसिप, राजकारण एकूणच कॉर्पोरेटमधील शर्यत तुम्हाला रुचत नसेल तर तुम्ही उद्योजक म्हणून जन्माला आला आहात हे समजा. अनेकांना कॉर्पोरेट शर्यत आवडते, राजकारण आवडते पण उद्योजक यांच्या विरोधात असतात. त्यांचे ध्येय पक्के असते आणि ते मिळवतातच!

बंडखोरी तुमच्यात हवी... उद्योजक म्हणजे आक्रामक व्यक्ती. जिंकणारा मनुष्य... शर्यत कोणतीही असो बंडखोर वृत्ती तुमच्यात हवीच त्याशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही. तर मित्रांनो... हे गुण तुमच्यात असतील तर तुमचा जन्म नक्कीच बिझनेस करण्यासाठीच झाला आहे.