सध्याच्या जनरेशनमध्ये यश मिळवण्याचे 4 मार्ग...

सध्याच्या जनरेशनमध्ये यश मिळवण्याचे 4 मार्ग...

"आमच्या जनरेशनने असे यश मिळवले", "आमच्या पिढीने वाईट परिस्थितीत दिवस काढले", "या बाबींमुळेच आमची पिढी या स्तरापर्यंत पोहोचली" अशाप्रकारचे अनेक संवाद आपल्या वडिलधा-यांनी आपल्याला सुनवले असतील. त्यांच ही बरोबर आहे. आपला मुलगा जीवनात यशस्वी व्हावा, असे कुणाला वाटत नाही. म्हणून त्यांच्या अनुभवांची सरबत्ती आपल्यावर सोडून मोकळे होतात. 

पण जेव्हा एक तरुण पंचविशीच्या पुढे जातो तेव्हा आर्थिकदृष्ट्या यशस्वी होणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच सध्याच्या जनरेशनमध्ये म्हणजेच 21 व्या शतकात यश मिळवण्याचे 4 मार्ग आम्ही तुम्हाला यामार्फत सांगणार आहोत, वाचा या पूर्ण बिझनेस ब्लॉग आणि या ब्लॉगमधील यशाचे मार्ग पटले तर नक्कीच शेअर करा...

तर सध्याच्या जनरेशनमध्ये यश मिळवण्याचे 4 मार्ग कोणते ते पाहू यात...

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा... तुम्हाला माहीतच असेल रिअल इस्टेटमध्ये अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. नवीन असो वा रेन्ट... प्लॉट, बंगले, फ्लॅट्स काही असो रिअल इस्टेट म्हणजे गुंतवणुकीसाठी बेस्टच. उदा. 2005 साली मुलुंडमधील एका दाम्पत्याने 8 लाख रुपयाला 500 चौ. मीटर 1 बीएचके फ्लॅट घेतला. आज त्याच फ्लॅटची किंमत 1 कोटीच्या घरात आहे. मित्रांनो एवढ्या झपाट्याने रिअल इस्टेटमधील घरांचे मार्जिन वाढत आहे. म्हणूनच रिअल इस्टेटमधील गुंतवणूक सर्वोत्तम! 


ऑनलाईन बिझनेस सुरु करा... तुम्हाला जो आवडेल किंवा ज्या बिझनेसमध्ये सर्वाधिक प्रॉफिट मार्जिन आहे, तसा ऑनलाईन बिझनेस सुरु करा. उद्योजकांनो, ऑनलाईन हेच भविष्य आहे. म्हणूनच अनेक यशस्वी बिझनेसमन्सनी आपले उत्पादन किंवा सेवा ऑफलाईन (दुकान, सुपरमार्केट्स आणि मॉलसहीत) ऑनलाईनवरही ठेवली आहे.


नवनव्या मार्केटिंगपद्धती शिका... बिझनेस कोच स्नेहल कांबळे नेहमी त्यांच्या सेमिनार आणि सेशन्समध्ये सांगत असतात. मार्केटिंग म्हणजे विपणन हा व्यवसायाचा आत्मा आहे. अशा असंख्य मार्केटिंगपद्धती आहेत. तुमच्या बिझनेसला जी योग्य वाटेल ती मार्केटिंग पद्धतीचा अवलंब करा. यापूर्वी नवनव्या मार्केटिंगपद्धती शिकण्यावर भर द्या.


तुम्हाला जे योग्य वाटतं त्यात गुंतवणूक करा... चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या मनाला जे योग्य वाटतं त्या बिझनेसप्रकारात विवेकबुद्धीने गुंतवणूक करा. तर मित्रांनो, हे होते सध्याच्या जनरेशनमध्ये यश मिळवण्याचे 4 मार्ग... याचा अवलंब करा आणि तुमच्या जीवनात यश मिळवा!