Maggi Noodles ने गमाविलेले 80% मार्केट शेअर कसे मिळवले!

Maggi Noodles ने गमाविलेले 80% मार्केट शेअर कसे मिळवले!

2015 च्या उन्हाळ्यातील प्रसंग आहे. भर दुपारी टीव्ही आणि सोशल मीडियावर एकाच बातमीने खळबळ माजली घेतली. न्यूजरुमध्ये रोज एकमेकांविरुद्ध आग ओकणारे नेत्यांची जागा फूड एक्सपर्ट आणि हेल्थ एक्सपर्ट यांनी घेतली होती. बातमी होती मॅगी नूडल्सवर घातलेली बंदी! दोन मिनीटात बनणारे Maggi Noodles बंद होणार असल्याने काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत विखुरलेल्या लहानांपासून मोठ्यांना हादरा बसला. गृहिणींचा तोंडचे तर पाणीच पळाले होते.

मॅगी नूडल्स का बॅन केले?

मॅगीच्या पाकिटावर मोठ्या अक्षरात ‘No added MSG’ म्हणजेच मोनोसोडिअम ग्लुटामेट या पदार्थ वापरलेला नाही, असे लिहीले होते. परंतु, याची शहानिशा करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यातील फूड इन्स्पेक्टर संजय सिंह यांनी मॅगीचे काही सॅम्प्लस गोरखपूर येथील लॅबमध्ये पाठवले. या अहवालात मॅगीमध्ये एमएसजीचे अधिक प्रमाण आढळले. पुन्हा हे सॅम्पल्स कोलकाता येथील लॅबमध्येही टेस्टिंगकरीता पाठवले होते, तेथूनही रिझल्ट पॉझिटिव्हच आला. त्यानंतर एक औपचारिक पत्राद्वारे मॅगी बनविणा-या नेस्ट्ले या कंपनीला नोटीस पाठविण्यात आली होती

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/HZ4JVQ

मॅगीचे अवाढव्य नुकसान

खाद्य सुरक्षा व औषध प्रशासन (एफएसडीए)ने नोटीस पाठविल्यानंतर आम्ही आमच्या प्रोडक्टमध्ये एमएसजी वापरत नाही असेच भासविले. परंतु, एवढ्या दिवसात लोकांचा मॅगीवरील विश्वास उडत चालला होता. म्हणून 2015 च्या जून-सप्टेंबर महिन्यादरम्यान 38,000 टन मॅगी जप्त करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या दरम्यान मॅगीची मूळ कंपनी असलेल्या नेस्ट्लेचे या क्षेत्रात टक्के मार्केट शेअर होते. या घटनेमुळे हे मार्केट शेअर शून्यापर्यंत गेला. मॅगी ‘क्लिनीकली डेड’ झाल्याचे अनेकांनी मान्य केले होते.

सुरेश नारायणन यांनी केले मॅगीचे पुनर्निर्माण 

भारतात मॅगीला लागलेल्या आगीचे चटके नेस्ट्लेच्या स्वित्झर्लंड येथे बसत होते. एका चुकीमुळे मॅगीचा भारतीय बाजारपेठेवरील होल्ड पूर्णपणे गेला होता. अशासमयी मॅगी पुन्हा मार्केटमध्ये आणने महत्त्वाचे होते. तसेच लोकांचा मॅगीवरील विश्वास पुर्नसंपादीत करणे, हेही तितकेच गरजेचे होते. म्हणून मॅगीने जोमाने काम करायला सुरुवात केली. नेस्ट्ले इंडियाचे चेअरमन आणि एमडी सुरेश नारायणन यांना तातडीने फिलिपाईन्स येथे बोलावून घेण्यात आले. त्यांनी मॅगीमध्ये प्रोडक्ट, पॅकेजिंगपासून ते जाहीरातीपर्यंत सर्व काही नव्या संकल्पना वापरल्या.

Click here to watch latest motivational videos https://goo.gl/X89tjD

सर्वप्रथम मॅगीने सर्व नूड्ल्समधून एमएसजीचे घटक हद्दपार केले. तसेच याची पून्हा लॅब्समध्ये तपासणीही केली फायनल प्रोडक्ट तयार केले. मॅगी बॅन केल्यानंतरच्या काळात अनेकांनी मॅगी नूड्ल्सची समरस असलेले अनेक प्रॉडक्ट बाजारात आणले होते. आणि त्यांनी बाजारात आपले पाय मजबूत केले होते. तेव्हा अशा प्रोडक्ट्सला टक्कर देणारे बिझनेस मॉडेल तयार केले गेले. सुरेश नारायणन सांगतात की, “मॅगीने केव्हाही आपल्या जाहीरातीवर जास्त भर दिला नव्हता. परंतु, मॅगी बॅन प्रकरणामुळे आम्ही सर्वाधिक भर जाहीरातीवर दिला.”

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा https://goo.gl/PBxA75

तसेच येणा-या चार वर्षात मॅगीला कोणकोणते काम करायचे, याचा रोडमॅप तयार केला. मॅगीपाठोपाठ नेस्ट्लेने चॉकलेट, कॉफी आणि बेबी फूडवर भर दिले आहे. फूडसहीत हेल्थवरही लक्ष केंद्रित करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. अशात-हेने मॅगीने मार्केट्मध्ये गमावलेले स्थान पुन्हा काबिज करीत आहे. परंतु, 14 महिन्यात मॅगीला झालेले नुकसान अवाढव्य असून मॅगी त्यातून हळूहळू बाहेर येत आहे.

To register for upcoming seminar click here http://snehalniti.com/event/