iPhone च्या स्वप्नातून बाहेर पडला असाल तर हे वाचा…

iPhone च्या स्वप्नातून बाहेर पडला असाल तर हे वाचा…

जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान असलेल्या अॅपलने आपल्या iPhone ची घोषणा केली. कॅलिफोर्नियातील अॅपल कॅम्पसमध्ये कंपनीचे सीईओ Tim Cook यांनी iPhone 8 व iPhone 8+ आणि iPhone X ची घोषणा केली. महत्त्वाचे म्हणजे 10 वर्षांपूर्वी स्टीव्ह जॉब्स यांनीच पहिला iPhone लाँच केला होता. आणि आज पुन्हा कूक यांनी iPhone चे स्वप्न दाखवले. परंतु वाचकांच्या जागरुकतेसाठी आम्ही Apple व iPhoneबद्दल काही महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

वर्षाला किती iPhone विकले जातात?

पहायला गेले तर iPhone हे एक स्टेट्स सिम्बल मानले जाते. म्हणून तो ठराविक हा फोन घेतात. 2017 या वित्तीय वर्षाच्या तिस-या तिमाहीत 4 कोटी 10 लाख तीस हजार iPhone विकले गेले. तर 2016 या पूर्ण वित्तीय वर्षात 21 कोटी 19 लाख आयफोन्स कंपनीने विकले होते.

Apple वि. iPhone चे मार्केट शेअर

गुगलच्या ॲन्ड्राईड या ऑपरेटिंग सिस्टीमने जगभरातील 81 टक्के स्मार्टफोन काबीज केले आहेत तर iPhone याबाबतीत फारच मागे आहे. आयफोन्सच्या आयओएसने फक्त 18 टक्के मार्केट काबीज करु शकले. आपले मार्केट शेअर वाढविण्यासाठी ॲपलने ‘स्विच’ ही नवी वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटद्वारे ॲपल ॲन्ड्राईड वापरणा-यांना टार्गेट करीत आहे.

का iPhone सर्वांपासून वेगळा आहे?

आयफोन अन्य स्मार्टफोन्सपासून वेगळे असण्याचे मूळ कारण म्हणजे त्याचे रिसर्च आणि डेव्हलपमेंट विंग. ॲपलने आर ॲन्ड डी विभागात 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळेच आपण iPhone मध्ये अतिसुंदर डिझाईन, क्षमता व अद्यावत तंत्रज्ञानाचा अनुभव मिळतो. टेक पंडिताच्यामते गुंतवणूक केलेली रक्कम 2015च्या तुलनेत 30 टक्के वाढीव आहे.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/HZ4JVQ

तरीही ॲपल आयफोन्सच्या सेल्सद्वारे पाहिजे तसा नफा कमावू शकला नाही. म्हणूनच ॲपलने आयपॅड्स, मॅकबुक, आयवॉच आणि ॲपल टीव्हीचे उत्पादन केले. जेणेकरुन भविष्यात या उत्पादनांमधून कंपनीला जास्तीत जास्त पैसे मिळू शकतात. ॲपल रिसर्च विंगच्या मते, रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंटमध्ये मोठी गुंतवणूक केल्याने आज अद्यावत आणि भविष्याचा वेध घेणारे तंत्रज्ञान लॅब्समध्ये विकसीत केले जात आहे. तसेच ॲपल सर्विसेस प्रोग्रॅमवरही काम सुरु आहे.

Click here to watch latest motivational videos https://goo.gl/X89tjD

ॲपलच्या भविष्यातील प्रोजेक्टसबद्दल माहिती

ॲपल कंपनीने काही महिन्यांपूर्वी ‘डीडी’ या चायनिझ कॅब सर्व्हिसेसवर 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘डीडी’ हा उबेरचा प्रतिस्पर्धी असेल. यावरुन येणा-या काळात ॲपल कॅब सर्व्हिसेसवर भर देण्याचे चित्र दिसत आहे. यासोबत ॲपल कार प्रोजेक्टवर काम करीत आहे. भविष्यातील स्मार्ट कार अशी या कारची संकल्पना आहे.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा https://goo.gl/PBxA75

iPhone 8 नंतर iPhone X, iPhone 9 कुठे आहे?

iPhone लॉन्च सोहळ्यात iPhone 8 व iPhone 8+ आणि iPhone X ची घोषणा केली. या घोषणेनंतर आयफोन 8 नंतर आयफोन X, आयफोन 9 कुठे आहे? असा प्रश्न निर्माण झाला. पण, यामागेही ॲपलचे वेगळेपण आहे. यंदा पहिला आयफोन लॉन्च होऊन दहावर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच ॲपलने आयफोन X हा फोन लॉन्च केला. यापूर्वी मायक्रोसॉफ्टने विंडोज 8 नंतर विंडोज 10 रिलीज केले होते.

To register for upcoming seminar click here http://snehalniti.com/event/

iPhone ची किंमत

iPhone हे एक स्टाईल स्टेटमेंट आहे मग याची किंमत तर जबरदस्त असणारच. यंदा लॉन्च केलेल्या आयफोन X ने तर लाखाचा टप्पा पार केला. ॲपलच्या आयफोन 8 ची किंमत 64 हजारांपासून सुरु होते. आयफोन 8 + ची किंमत 73 हजारापासून पुढे आहे. तसेच आयफोन X च्या 64 जीबी मॉडेलची किंमत 89 हजार तर 256 जीबी मॉडेलची किंमत 1.02 लाख एवढी आहे.