तुमचा Business वाढवण्याचे क्रिएटिव्ह आणि मोफत मार्ग…

तुमचा Business वाढवण्याचे क्रिएटिव्ह आणि मोफत मार्ग…

तुम्हाला हे माहीतच असेल की, मौखिक जाहिरातीच्या माध्यमातून व्यवसायाची प्रसिद्धी करणे हा तुमचा Business वाढविण्याचा सर्वात जबरदस्त मार्ग आहे. खाली काही क्रिएटिव्ह मार्ग दिले आहेत ज्यांचा तुम्ही वापर केलात तर इतर लोक तुमच्या व्यवसायाची जाहिरात करतील आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच इतरांकडे तुमची शिफारस करण्यासाठी मदत करतील… आणि हो या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही.

प्रेस रिलीज काढा – प्रसारमाध्यम हे नेहमी नवनवीन बातम्यांच्या शोधात असते. जेव्हा तुम्ही कोणाला कामावर ठेवता, एखाद्याचा हुद्दा वाढवता किंवा तुम्हाला एखादा पुरस्कार मिळतो, तुम्ही एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करता, नवीन ठिकाणी आपला व्यवसाय हलवता किंवा व्यवसायाशी संबंधित कोणतही लोकांना सांगण्याजोगे काम करता, तेव्हा प्रेस रिलीज लिहा. तुमचे स्थानिक व्यावसायिक संपादक कोण आहेत, ते शोधून काढा आणि तुमच्या बातमीचा ईमेल त्यांना पाठवा. तुमच्या अनेक प्रेस रिलीज या स्थानिक वर्तमानपात्रांकडून छापल्या जातील. तसेच वेळोवेळी लेखक तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या व्यवसायाशी निगडीत लेख लिहिण्याबद्दल विचारणा करू शकतो. कदाचित तुमचा लेख फोटोसह वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर देखील येऊ शकतो.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

शिफारस करणाऱ्या स्त्रोतांना मोफत सेवा द्या – समाजातील प्रतिष्ठीत लोकांना आणि सेवा प्रदात्यांना मोफत सेवा देणे म्हणजेच लोकांमध्ये प्रसिद्ध होण्याचा आणि शिफारस मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. अकाउंटन्ट्स, कायदे क्षेत्रातील अधिकारी, बँकर्स किंवा कोणताही इतर सेवा प्रदाता जो तुमचा संभाव्य क्लायंट आहे तो,  असे संबंध प्रस्थापित करण्याच्या वेळेस तुमचा करार असेल की तुमचे क्लायंट्स तुमचा व्यवसाय लोकांमध्ये प्रसिद्ध करतील आणि लोकांना तुमच्या व्यवसायाची शिफारस करतील आणि त्याबदल्यात तुम्ही त्यांना तुमच्या सेवा मोफत द्याल.

Click here to watch latest motivational videos 

मोफत किंवा सवलतीमध्ये सेवा देण्यासाठी गिफ्ट सर्टिफिकेट्स द्या – चेंबर ऑफ कॉमर्स, सिव्हीक क्लब्स आणि चॅरिटी अशा संघटना नेहमी विशेष कार्यक्रमांसाठी कुठून निधी मिळतोय का ते पाहत असतात. तुम्ही दिवसाची, आठवड्याची किंवा वर्षाची कोणतीही वेळ निवडून कार्यक्रमावेळी लोकांना मोफत गिफ्ट सर्टिफिकेट्स देऊ शकता किंवा सवलतीमध्ये आपल्या सेवा प्रदान करू शकता. असे केल्याने तुमच्या नावाचा त्या संस्थेकडून प्रचार केला जाईल आणि जेव्हा तुम्ही मोफत सेवा द्याल तेव्हा तुमचा व्यवसाय इतर उद्योजकांच्या नजरेस येईल. जर तुम्ही तुमच्या सेवा उत्तमरीत्या प्रदान केल्या तर तुम्हाला कदाचित क्लायंट मिळू शकतो किंवा कोणी तुमची शिफारस करू शकते. आणि जर नशीब मेहरबान असेल तर या दोन्ही गोष्टी तुमच्या पदरात पडू शकतात.

इतरांची शिफारस करा – तुम्ही दुसऱ्यांकडे इतरांची शिफारस करा आणि त्याबदल्यात ते इतरांना तुमची शिफारस करतील. इतरांशी किंवा तुम्हाला ज्या सेवा प्रदात्याशी संबंध प्रस्थापित करायचे आहेत त्यांच्याशी बोलताना त्यांना कोणत्या सेवा हव्या आहेत, हे जाणून घेताना जागरूक रहा.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

अभिप्राय मिळवा – तुम्ही जेथे कुठे तुमची सेवा प्रदान कराल तेव्हा दरवेळेस तेथून तुमच्या सेवेबद्दल अभिप्राय घेण्यास विसरू नका. अनेक क्लायंट्स त्यांचा अभिप्राय देत नाहीत कारण तुम्ही अभिप्राय देण्याइतकं त्यांना खुश केलेलं नसतं. तुमच्या भेटीवेळी किंवा फोन कॉल वेळी फक्त एक पेन आणि पेपर घेऊन बसा आणि तुमच्या क्लायंटला विचारा की तुमच्या सेवा किंवा उत्पादनांमुळे त्यांना कसा फायदा झाला. त्यांचे अभिप्राय लिहून घ्या आणि पुन्हा ते टाईप करून त्यांची मंजुरी घेण्यासाठी त्यांना इमेलद्वारे पाठवा. जर ते कामात खूप व्यस्त असतील तर पाठवलेल्या मेलचा पाठपुरवठा करण्यासाठी तुम्हाला एकदा त्यांना फोन करावा लागेल. एकदा का तुम्हाला त्यांची मंजुरी मिळाली की तुम्ही त्यांचे अभिप्राय तुमच्या वेबसाईटवर, तुमच्या मार्केटिंग सामग्रीवर किंवा तुमच्या ऑफिसच्या भिंतीवर देखील प्रसिद्ध करू शकता. अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे त्यांना स्वत:च्या शिफारशीसाठी लिंक्डइन रिक्वेस्ट पाठवा, तुमच्या क्लायंटला तो अभिप्राय तुमच्या प्रोफाईल खालील लिंक्डइन फिल्डमध्ये कॉपी-पेस्ट करायला सांगा.

To register for upcoming seminar click here 

पूरक उद्योगांसोबत भागीदारी करा – जर तुम्ही एक सेवा प्रदाता म्हणून काम करीत आहात तर तुम्ही तुमच्या क्लायंट्ससाठी एक विश्वासू सल्लागार म्हणून ओळखले जाल. यामुळे तुम्ही अशा स्थितीमध्ये पोहोचाल जेथे तुमचे क्लायंट्स सर्वच गरजांसाठी तुमची मदत घेतील. जसे की वेब डिजाइनर्स, ग्राफिक डिजाइनर्स, बँक्स, अकाउंट्स वगैरे वगैरे. या बी2बी कंपन्या इतर कामांसाठी इतरांपुढे तुमची शिफारस देखील करू शकतात. तुम्ही सर्वप्रथम मुद्दाम या व्यवसाय पूरक उद्योगांशी जोडले जा आणि त्यानंतर त्यांचे धोरणात्मक भागीदार व्हा. तसेच एकमेकांना सहाय्य करण्याची योजना आखा.

को-ब्रँड – तुम्ही धोरणात्मक भागीदारीमध्ये अजून एक पाऊल उचलू शकता ते म्हणजे संयुक्तरित्या तुमच्या व्यवसायांची जाहिरात करू शकता आणि त्यांचा प्रसार करू शकता. तुम्ही तुमच्या धोरणात्मक भागीदारासह मार्केटिंग सामग्री, जाहिराती उपक्रम तयार करू शकता, तसेच व्यावसायिक सभा भरवू शकता.

या अशा प्रकारच्या एकही पैसा न खर्च करता उपयुक्त ठरणाऱ्या कल्पना वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता आणि अतिशय जास्त नफा मिळवू शकता.