Virat Kohli ने का तोडले पेप्सीशी नाते…

Virat Kohli ने का तोडले पेप्सीशी नाते…

भारताचा आक्रमक फलंदाज आणि कर्णधार Virat Kohli चर्चेत नसणे म्हणजे नवलच. क्रिकेटच्या मैदानावरील आक्रमक स्वभावामुळे ते अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचे प्रेमप्रकरण, विराटची चर्चा तर होत असते. परंतु, तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि ते म्हणजे ‘पेप्सीको’ या शीतपेयाच्या ब्रॅन्डमुळे. विराटने आपले पेप्सीसोबतचे सहा वर्षे जुने असलेले नाते तोडल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे क्रीडा ते जाहीरात क्षेत्रातील अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दी इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, “ॲथलिट विराट कोहली हा एक यूथ आयकॉन आहे. तसेच त्याला फिटनेस आणि वर्कआऊटसाठी आदर्श मानतात. अशावेळेस यूथ आयकॉनने शीतपेयाची इन्डॉर्समेंट करणे, हा विरोधाभासात्मक संकेत समाजामध्ये पसरला जाऊ शकतो.’’ म्हणूनच कोहलीने ‘पेप्सीको’शी डील तोडल्याचे बोलले जात आहे. 

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/HZ4JVQ

“विराट कोहली आणि पेप्सीमधील जुना करार संपुष्टात आला आहे. दोन्ही पक्ष नवा करार करण्याच्या तयारीत नाहीत. तसेच पेप्सी आपला ब्रॅन्ड ॲम्बेसेडर म्हणून नव्या चेह-याच्या शोधात आहे,’’ असा खुलासा पेप्सिकोच्या प्रवक्त्यांनी ईमेलद्वारे केला आहे.

Click here to watch latest motivational video https://goo.gl/X89tjD

दरम्यान, भारतीय क्रिकेट आणि ‘पेप्सीको’चे जुने संबंध आहेत. कपिल देव, जवागल श्रीनाथ, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंह धोनी आणि आता विराट कोहली असे अनेक आंतरराष्ट्रीय ॲथलिट्सने ‘पेप्सीको’ या ब्रॅन्डचे प्रमोशन तसेच ब्रॅन्ड ॲम्बेसेडरपद भुषविले आहे. तसेच पेस्पीने अनेक खेळांच्या सामन्यांचे प्रयोजन केले आहे.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा https://goo.gl/PBxA75

म्हणूनच विराट कोहलीने ‘पेप्सीको’शी संबंध तोडल्याची बातमीने सा-यांच्या नजरा या विषयावर खिळल्या गेल्या. फिटनेसवर भर देणा-या विराट आणि भारतीय संघाने नुकतीच झालेली श्रीलंका मालिकेत निर्भेळ यश मिळवले. वनडे, कसोटी आणि टी 20 या सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये टीमने श्रीलंकेला धूळ चारली आहे.

To register for upcoming seminar click here http://snehalniti.com/event/

तसेच 2019 मध्ये होणा-या विष्वचषक स्पर्धेत जो फीट असेल तोच संघात स्थान मिळवेल असे तडफदार विधानही विराट कोहली यावेळी केले होते. यावरुन तो फिटनेसबाबत केवढा गंभीर आहे, हे कळते.