कल्ट स्टेट्स निर्माण केलेले Brands…

कल्ट स्टेट्स निर्माण केलेले Brands…

आता बिझनेसमनने बिझनेस करणे आव्हानात्मक राहिले नाही. उद्योजक कसा बिझनेस करतो, त्याचे प्रोडक्टसची मार्केट वॅल्यू काय? त्याने देऊ केलेल्या सेवेचा ग्राहकांवर केवढा प्रभाव पडतो, बिझनेसमध्ये एखादी सेवा किंवा उत्पादन देणे हे महत्त्वाचे आहे, परंतु आपली सेवा ग्राहकांसाठी प्रभावशाली ठरते की नाही, याचे मुल्यांकन करणे गरजेचे आहे, त्यातूच आपले Brands कल्ट स्टेट्स निर्माण करतात. पाहुया असे काही ब्रॅन्ड्स ज्यांनी देशात कल्ट स्टेट्स निर्माण केला…

अमूल – आनंद मिल्क युनिट लिमीटेड अर्थात अमूल आज दुग्धजन्य पदार्थ्यांच्या मार्केटमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. अमूलचे फाऊंडर वर्गिस कुरिअन यांनी भविष्याचा वेध घेत संघटनेची सुरुवात केली. आज अमुलचा बिझनेस संपूर्ण भारतात पसरला आहे. सर्वप्रथम उत्पादनाची जाहीरात आणि उत्तम मार्केटिंगमुळेच अमूल आज एक कल्ट ब्रॅन्ड म्हणून समोर आला.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/HZ4JVQ

बजाज – बजाज टू व्हिलर कंपनीने 1990-2000 या सालामध्ये मोठी भरारी घेतली. गिअर व नॉन गिअरमध्ये मिळणा-या अनेक मॉडेल्सनी संपूर्ण देशात धुमाकूळ घातला होता. दरम्यान, त्याचवेळेस आलेली ‘हमारा बजाज’ ही जाहीरातही चांगलीच गाजली होती. ग्राहकांना आवडलेले मॉडेल्स आणि मार्केटिंगमुळे बजाजच्या गाड्यांचाही ब्रॅन्ड स्टेट्स बनला आहे.

Click here to watch latest motivational video https://goo.gl/X89tjD

टायटन – टाटा ग्रुपचा एक भाग असलेल्या टायटन या घड्याळ्याच्या कंपनीनेही आपला एक कल्ट स्टेट्स निर्माण केला आहे. आज नवीन व अद्यावत ब्रॅन्ड्स या मार्केटमध्ये आले असले तरीही टायटनची बात काही औरच आहे. तरुणांसाठी वेगळं, जोडप्यासाठी सुंदर कलेक्शन्स अशात-हेने टायटनने सर्व स्तरातील ग्राहकांसाठी घड्याळ तयार केली.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा https://goo.gl/PBxA75

थम्स अप – कोकाकोला या कंपनीकडून थम्स अप शीतपेय बाजारात आणले गेले. थम्स अपसमोर पेप्सीचे कडवे आव्हान होते. परंतु हार्ड असणा-या शीतपेयाने आपले वेगळे मार्केट निर्माण केले. सुरुवातीपासूनच थम्स अपला साहसाशी जोडले गेले व त्याची जाहीरातही अशीच केली गेली. म्हणून थम्स अप हा एक कल्ट ब्रॅन्ड निर्माण झाला.

To register for upcoming seminar click here http://snehalniti.com/event/

मॅगी – ‘रेडी टू इट’ उत्पादनांमध्ये मॅगीने अढळपद निर्माण केले आहे. ‘टू मिनीट्स रेडी’, ‘मेरीवाली मॅगी’ अशा अनेक कॅम्पेन्स करुन मॅगीला सर्वत्र पोहोचवली. तसेच तरुणांमध्ये मॅगी फेमस असल्यामुळे त्याचा खप वाढत राहिला. दरम्यान, मॅगीच्या उत्पादनावर काही काळ रोख लगवाली होती. त्यातूनही मॅगीने फिनीक्स भराली घेतली. अशात-हेने आपणही आपल्या ब्रॅन्डला कल्ट स्टेट्स निर्माण करुन देऊ शकतो.