दोनदा मोजमाप घ्या – पण एकदाच सरळ कापा : कशाप्रकारे एका सुताराने मला यशस्वी

दोनदा मोजमाप घ्या – पण एकदाच सरळ कापा : कशाप्रकारे एका सुताराने मला यशस्वी

यशस्वी मार्केटिंगबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण धडा मी तेव्हा शिकलो जेव्हा मी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. तोपर्यंत मला जवळ असलेल्या ज्ञानाचा वापर नेमका कसा करायचा कळले नव्हते, पण हा जो धडा मिळाला तो माझ्या कायम लक्षात राहिला.

एकदा उन्हाळ्यात जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा किचन कॅबिनेट बनवणाऱ्या एका कंपनीसाठी मी काम केले होते. सुतार आपले काम कसे करीत आहे, ते पाहणे माझे काम होते, तेव्हा मी पाहिले की एक सुतार जेथे कॅबिनेटचे दरवाजे जोडले जात आहेत तो भाग कापत होता. माझ्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी मी तेथील मुख्य सुताराला विचारले होते की बोट कापून न घेण्याव्यतिरिक्त तुमच्या कामामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? तो म्हणाला, नेहमी लक्षात ठेव ”दोनदा मोजमाप घ्या – पण एकदाच सरळ कापा” हळूहळू आम्ही मित्र झालो आणि तो नेहमी मला हसत हसत विनोदाने त्या वाक्याची आठवण करून द्यायचा की, ”दोनदा मोजमाप घ्या – पण एकदाच सरळ कापा”. हळूहळू सर्वजण मला त्याच वाक्याने हाक मारू लागले होते. ते माझे टोपण नाव झाले होते जणू!

आज एवढ्या वर्षानंतर माझ्या अखेर लक्षात आलंय की विक्री आणि मार्केटिंग क्षेत्रामध्ये मी जे काही नाव कमावलं आहे, जे काही यश संपादन केलं आहे, त्यामागे त्या मोजमापाच्या वाक्याचा महत्त्वाचा वाटा आहे. पण इथे लाकडाचे मोजमाप घेणे असा त्या वाक्याचा अर्थ होत नाही. इथे त्याचा संबंध आहे माझ्या विक्री आणि मार्केटिंग कृतींशी. एक विक्रेता म्हणून आपण नेहमी कधीही न संपणाऱ्या मार्केटिंग आणि विक्री विषयक कृतींची यादी पाहत असतो, ज्यावर आपण आपला वेळ आणि पैसा खर्च करू शकतो; त्यापैकी काही पद्धती इतक्या प्रभावशाली असतात की तेवढा आपण विचार देखील केला नसेल. फेसबुक, ईमेल, ट्विटर, लिंक्डइन, वेब नंतर आता पुढे काय निर्माण होणार आहे, हे देव जाणे. जे काही निर्माण होईल ते आपल्याला खुणावेल आणि म्हणेल, या माझा वापर करा. तुमच्या मार्केटिंग क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणारी गोष्ट हीच आहे.

तुम्ही म्हणत असाल की आपण अश्या ठिकाणी पोचलो आहोत जेथे आपल्यासमोर असंख्य पर्याय आहेत पण पुरेसा वेळ नाही आहे. पण एक लक्षात घ्या की असंख्य पर्याय असणे हा तोच क्षण आहे जेथे मोजमाप करणे खरंच गरजेचे आहे. अत्याधुनिक मार्केटिंगपद्धतींना जवळ करणे अगदी सहज सोपे आहे आणि जर प्रत्येक जण त्याचा वापर करीत असेल किंवा त्याच्या वापरासाठी आतूर असेल तर ते अधिकच सोपे आहे. म्हणूनच जे काही नवीन आधुनिक, अत्याधुनिक आहे ते बिनधास्त आत्मसात करा. सर्वात सोप्या गोष्टीची निवड करा आणि जे सर्वात स्वस्त आहे त्याला जवळ करा. मला फक्त एकाच गोष्टीची काळजी आहे की तुम्ही दोनदा मोजमाप करीत आहात आणि जे काम करत नाही आहे ते कापून टाकत आहात.