भारतीय रस्त्यांची ओळख असलेली 'मारुती सुझुकी'ची सक्सेस स्टोरी...

भारतीय रस्त्यांची ओळख असलेली 'मारुती सुझुकी'ची सक्सेस स्टोरी...

भारतातील रस्त्यांवर सर्वाधिक चालणारी गाडी कोणती, असा कोणी प्रश्न केला. तर आपल्याला मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या हेच उत्तर मिळेल. आणि हे उत्तर तितकेच तंतोतंत खरे आहे. सर्वप्रथम मारुती आणि नंतर जपानच्या सुझुकी कंपनीसोबत केलेल्या हातमिळवणीमुळे या कंपनीने विदेशात भारताचे नाव पोहोचवले. गेली अनेक दशके मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही कंपनी भारतीय रस्त्यांची ओळख ठरली आहे, घेऊयात या कंपनीच्या यशाचा आढावा…

सुरुवात... साधारण 70 च्या दशकात मारुती उद्योग लिमिटेड या कंपनीचा उदय झाला. मध्यमवर्गीय भारतीयांना स्वतःच्या गाडीतून फिरता यावे, यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जातीने मारुतीच्या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले. साध्या गाड्या बनविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आपल्याकडे नव्हते. म्हणूनच मारुतीने जपानच्या सुझुकी मोटर कंपनीसोबत काम करण्यास सुरुवात केली.


पहिल्या गाडीचे अनावरण... 14 डिसेंबर, 1983 साली मारुती सुझुकीने आपली पहिली गाडी लॉन्च केली, तिचे नाव होते 'मारुती 800'. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोठ्या उत्साहाने पहिल्या गाडीची चावी हरपाल सिंह यांना सुपूर्त केली. यावेळी या गाडीची इंजिन क्षमता 796 सीसी एवढी होती. 800 सीसी पासून सुरू झालेला मारुती सुझुकीच्या गाड्यांचा हा प्रवास आज 2,000 सीसीपर्यंत पोहोचला आहे. एकेकाळी एका गाडीचे उत्पाद्न घेणारी ही कंपनी आज 20 हून अधिक गाड्यांचे उत्पादन घेत आहे.


'मारुती'ने ॲम्बेसेडर व पद्मिनीला मागे सारले… 80-90 साली मारुती सुझुकीच्या भारतात मोजक्याच गाड्या धावत होत्या. त्यामध्ये श्रीमंतांची ओळख असलेली ॲम्बेसेडर व पद्मिनी या गाड्यांची त्यावेळेस चलती होती. परंतु, या गाड्या सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर होत्या. हीच संधी साधून मारुतीने 'कॉम्पॅक्ट कार' ही संकल्पना देशात रुजवली. आज ॲम्बेसेडर व पद्मिनी या गाड्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच राहिल्या आहेत. दुसरीकडे मारुतीचा डोलारा दिवसेंदिवस वाढत जात आहे.


'मारुती सुझुकी'ची खासियत… सर्वप्रथम साधेपणा हा मारुती सुझुकीच्या गाड्यांची खासियत आहे. शॉर्ट आणि स्विट अशा कॉम्पॅक्ट कारची संकल्पना कंपनीने देशात रुजवली आणि ही संकल्पना मध्यमवर्गींयांना चांगलीच आवडली. तसेच कमीतकमी मेन्टेनन्स हे मारुतीच्या गाड्यांचे वैशिष्ट्य आहे. "गाडीच्या मिटरचा आकडा लाखो किलोमीटर गेला तरी गाडी उत्तम." "आम्ही फक्त गाडीचे टायर बदलले आहेत," असा फिडबॅक अनेक ग्राहक अभिमानाने देतात. गाड्यांच्या उत्तम बांधणी तसेच परवडणा-या किंमतीमुळे मारुतीने ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.


40 हजार कर्मचारी... मारुती सुझुकी कंपनीत एकूण ४० हजार कर्मचारी काम करतात. एवढेच नाहीतर हजारो रोबोटही कार बांधणी, कार पेंटिंगचे काम करतात. तर कंपनीचा निव्वळ नफा 77,326 मिलियन अमेरिकन डॉलर इतका आहे.

अनेक प्रकारांत गाड्या उपलब्ध... आज मारुती सुझुकी कंपनीच्या हॅचबॅग, सिडन, एमयूव्ही आणि एसयुव्ही अशा अनेक प्रकारात गाड्या आहेत. तसेच कंपनीने अनेक वर्षांपासून देशी-विदेशी कार कंपन्यांना जोरदार टक्कर देत अव्वल क्रमांकावर राखला आहे. अशात-हेने अनुकूल परिस्थितीवर मात करीत मारुती सुझुकीने आपला व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. तर ही होती मारुती सुझुकी कंपनीची सक्सेस स्टोरी. बिझनेसविषयक माहितीसाठी #SnehalNiti च्या वेबसाईट, फेसबूक, ट्विटर आणि युट्यूब पेजला भेट द्या…