उद्योजकाने व्यवसाय कराव्या अशा काही Business Industries

उद्योजकाने व्यवसाय कराव्या अशा काही Business Industries

व्यवसायात यशस्वी होणं म्हणजे उद्योजकांच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश आहे. हेच ध्येय ठेऊन अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करतात. अनेकांना बिझनेस करण्याची इच्छा असते; परंतु अनेकांना बिझनेस कोणत्या इंडस्ट्रीत करायचा हेच माहीत नसते. माझ्या प्रगती फास्ट या सेशन्सला उपस्थित राहणारे उद्योजक एकच प्रश्न विचारतात. “सर, बिझनेस करायचा आहे; पण कोणता बिझनेस माझ्यासाठी फायदेशीर ठरेल, ते सांगा.” म्हणूनच आज आपण पाहू यात अशा काही Business Industries ज्या तुम्हाला नक्कीच यशस्वी उद्योजक बनवू शकतात…

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

फॅशन… पूर्वीपासून जगभरात फॅशन इंडस्ट्री जोमात सुरू आहे. भविष्यकाळातही नवनवे फॅशन ट्रेंड बाजारात येणारच आहेत. म्हणूनच या इंडस्ट्रीत सदासर्वकाळ सुगीचे दिवस असतात. पूर्वी बाजारापर्यंत सीमीत असलेली ही इंडस्ट्री आज ऑनलाईन आणि मोफत घरपोच डिलीव्हरीपर्यंत पोहोचली आहे. तसेच या इंडस्ट्रीमध्ये कपडे, पादत्राणे, अॅसेसरिज आणि मेकअप असे अनेक आयाम पडतात, म्हणूनच नव्या उद्योजकांना या इंडस्ट्रीमध्ये येऊन बिझनेस करणे फायदेशीर आहे.

Click here to watch latest motivational videos 

स्पोर्ट्स… पाश्चिमात्य क्रीडा उद्योगास अनुसरून आपण अनेक खेळांच्या प्रीमिअर लिग्स सुरू केल्या. खेळाडूंना मॅनेज करण्यासाठी अनेक कंपन्या किंवा मॅनेजर म्हणून नवा उद्योग नावारुपास आला आहे. तसेच खेळांना प्रोड्युस करणे, अनेक सुविधा देणे, खेळाचे सामने प्रसारित किंवा आयोजन करणे, असे अनेक नवे उद्योग आपण उद्योजक म्हणून करू शकतो. खेळाच्या सामानांचा व्यवसायही आपण करू शकतो. उदाहरणार्थ – डेकॅलथॉन स्पोर्ट्स मॉल, येथे खेळ आणि खेळाडूंना लागणारी प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहेत.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री… आपण या उद्योगास आदरातिथ्य उद्योग असेही म्हणू शकतो. जगभर चालणारा आणि शत-प्रतिशत पैसे कमावून देणारी अशी ही बिझनेस इंडस्ट्री आहे. आपल्यला येथे फक्त उत्तम सेवा आणि वेळी-अवेळी काम करता आले पाहिजे. या इंडस्ट्रीचे हॉटेलिंग, लॉजिंग, इव्हेंट प्लॅनिंग, परिवहन आणि टुरिझम असे आयाम पडतात. म्हणूनच ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा जगभर बोलबाला आहे.

To register for upcoming seminar click here 

फिजीकल फिटनेस… मागील काही वर्षांपासून फिजीकल फिटनेस म्हणजेच शारीरिक तंदुरुस्ती यावर आधारलेला उद्योग वाढीस लागला आहे. यात योग, जीम्स, क्रॉस फिट, झुंबा असे अनेक आयाम आढळतात. तसेच हा बिझनेसही ऑफलाईनपासून ऑनलाईनवर गेला आहे. अनेक फिटनेस ट्रेनरचे व्हिडीओज आणि टुटोरिअल्स आपण पैसे देऊन पाहू शकतो. म्हणूनच या इंडस्ट्रीतही कोट्यवधी रुपयांची उलथापालथ होत आहे.

दरम्यान, अशा अनेक इंडस्ट्री आहेत ज्यामार्फत आपण आपला बिझनेस सुरू करून त्यात मोठी झेप घेऊ शकतो, यातील सध्या ट्रेंडिंगमध्ये असणा-या इंडस्ट्रीज आम्ही येथे मांडल्या आहेत. अनेक कलाकार, खेळाडू आणि उद्योजकांनी या इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करून कोट्यवधी रुपये कमाविले आता मराठी उद्योजकांनो वेळ आपली आहे…