Justdial व्यवसाय वाढविण्याची पॅशन असेल तर नक्कीच यशस्वी व्हाल!

Justdial व्यवसाय वाढविण्याची पॅशन असेल तर नक्कीच यशस्वी व्हाल!

फक्त कॉलिंग करून किंवा सर्च सर्व्हिसेसची माहिती देऊन कोण श्रीमंत होईल का? विचारात पडला ना… होय असे झाले आहे. व्हीएसएस मणी यांनी Justdial ही कंपनी सुरू केली आणि आपला बिझनेस वाढवून श्रीमंत आणि भारतातील यशस्वी उद्योगपती म्हणून नाव कमाविले. तर आज पाहू यात Justdial चे फाऊंडर, एमडी आणि सीईओ व्हीएसएस मणी यांच्या जबरदस्त कार्याबद्दल…

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

मूळचे दक्षिण भारतीय असलेले व्हीएसएस मणी यांचा जन्म झारखंडमधील जमशेदपूर येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मणी यांनी बिझनेस सुरू करण्याचे ठरवले; परंतु व्यवसाय कोणता सुरू करायचा हा प्रश्न होताच. तेव्हा गुगलच्या धर्तीवर सर्च सर्व्हिसेस अशी निराळी सेवा देण्याचे काम मणी यांनी सुरू करण्याचे ठरवले. आज आपल्याला कोणतीही सेवा पाहिजे असेल तर आपण गुगल सर्च करतो. त्याच खालोखाल घरपोच काही सर्व्हिस हव्या असतील तर Justdial ही साईट लॉग इन करतो किंवा कॉल करतो आणि आपल्याला हवी असलेली सेवेची मागणी करतो.

Click here to watch latest motivational videos 

Justdial ची सुरुवात… मणी २२ वर्षाचे असताना त्यांच्या मनात Justdial ची कल्पना आली होती आणि हीच कल्पना घेऊन त्यांनी ‘आस्कमी’ नावाची कंपनी सुरू केली होती; परंतु ती खास काही करू शकली नाही. म्हणून मणी या कंपनीचा गाशा गुंडाळला आणि जस्ट डाईल ही कंपनी सुरू केली. तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही सर्व्हिसेची माहिती हवी असेल तर तुम्ही कंपनीला कॉल करा. कंपनीचा प्रतिनिधी चटकन तुम्हाला त्या सर्व्हिसेसबद्दलची माहिती देईल. तेही मोफत, एवढी साधी सोपी बिझनेस कल्पना मनी यांनी काढली आणि त्याचा बिझनेस सुरू केला.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

सदिच्छादूत म्हणून अमिताभ बच्चनची नियुक्ती… आज Justdial कंपनीला आज २२ वर्षे पूर्ण झाली. कंपनीचा बिझनेस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमिराती या देशातही वेगाने सुरू आहे. कंपनीचा रेव्हेन्यू ९०० कोटींपर्यंत पोहोचला आहे तर Justdial च्या कर्मचा-यांची संख्या दहा हजारांहून अधिकवर पोहोचली आहे. काही वर्षांपासून हिंदी सिनेसृष्टीतील शहेनशहा अमिताभ बच्चन हे कंपनीच्या सदिच्छादूतपदी आहेत. कंपनीचे फाऊंडर, एमडी आणि सीईओ असलेले व्हीएसएस मणी सांगतात की, “बिझनेसमनला व्यवसाय वाढविण्याची पॅशन असेल तर तो नक्कीच यशस्वी होईल.” मराठी बिझनेसमनने स्वतःचे आपली पॅशननेच व्यवसाय करावा.

To register for upcoming seminar click here