H. Vasanthakumar रिटेल बिझनेसचा राजा; बिझनेस वाढवला २२ रुपयांपासून ते ९०० कोटी रुपयांपर्यंत

H. Vasanthakumar रिटेल बिझनेसचा राजा; बिझनेस वाढवला २२ रुपयांपासून ते ९०० कोटी रुपयांपर्यंत

जगभरात अशी काही लोक आहेत ज्यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले. काही लोकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, काहींनी खेळात सर्वोच्च कामगिरी केली, काहींनी लिखानाने सर्वांची मने जिंकली. तर काहींनी आपला बिझनेस किंवा सर्वांगीण विकास साधण्याकरीता सर्वोत्तम कामगिरी केली. दाक्षिणात्य भारतात बिझनेसमध्ये मोठे नाव कमाविणा-या  H. Vasanthakumar यांच्याबाबत आपण माहिती घेऊयात. पाहू यात त्यांनी आपला बिझनेस एम्पायर कसा वाढवला.

H. Vasanthakumar यांचा जन्म तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील सर्वसामान्य कुटूंबात झाला. शाळा-महाविद्यालयीन शिक्षणानंतर वसंतकुमार यांनी ‘व्हीजीपी’ येथे सेल्समन म्हणून नोकरी करण्यास सुरू केली. नोकरीत मन रमेना तसेच आठ वर्षांनंतरही त्यांची वाढ बेताचीच राहिली म्हणून नोकरी सोडण्याचा विचार त्यांनी घेतला. ते सांगतात, “मी कामावर असलेल्या ‘व्हीजीपी’ येथे मला जीवाचे मित्र भेटले आणि आपल्या आयुष्यात पुढे जायचे असेल तर व्यवसाय सुरू करावाच लागेल, हे कळाले.” त्यानुसार वसंतकुमार यांनी आपली वाटचाल सुरू केली.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

२२ रुपये कर्ज मिळाले… वसंतकुमार हे ‘व्हीजीपी’ येथे सेल्समन असताना अनेक ग्राहकांची ओळख झाली, काहींचे रुपांतर घनिष्ठ मैत्रीत झाले. तेव्हा एका मित्राला त्यांनी त्यांची बिझनेस कल्पना मांडली, त्या मित्राने कर्ज म्हणून त्यांना २२ रुपये दिले. तर दुस-याने त्याची छोटीशी जागा भाड्य़ाने दिली. अशात-हेने नोकरी सोडल्यानंतर काही काळातच त्यांनी ‘वसंत अॅन्ड कंपनी’ची सुरुवात केली. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅजेट्स, होम अॅप्लायन्स, कंझ्युमर ड्युरेबल्स आदि उत्पादने ग्राहकांना पुरवण्याचे काम करीत होती.

Click here to watch latest motivational videos 

‘वसंत अॅन्ड कंपनी’च्या भरभराटी मागचे कारण… १९७८ साली तंत्रज्ञानाच्या झटपट विकासामुळे इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला चांगलीच झळाली मिळाली होती आणि यात परदेशीय कंपन्यांच्या प्रोडक्टची मार्केटमध्ये चलती होती; परंतु वसंतकुमार यांनी आपल्या देशात बनणा-या मालाचे रिटेलिंग करण्यास सुरुवात केली. ते सेल्समन असल्यामुळे त्यांच्या ओळखी जास्त होत्या. तसेच त्यांनी आपल्या बिझनेसमध्ये  एक रणणीती राबवली. “वसंत अॅन्ड कंपनी”कडून अर्ध्या किंमतीमध्ये वस्तू विकत घ्या आणि सहा महिन्यांनंतर पैसे पूर्ण द्या, या स्वरुपाची स्ट्रॅटेजी त्यांनी आपल्या बिझनेसमध्ये राबवली. मुळातच भारतात मध्यमवर्गियांची संख्या सर्वाधिक आणि त्यात तुम्ही अशी ऑफर दिल्यावर कोण नाही वस्तू खरेदी करणार, अशा ऑफर्समुळे ‘वसंत अॅन्ड कंपनी’ला भरभराटीचे दिवस आले आणि ग्राहकांनीही तेथूनच प्रॉडक्ट घेणे पसंत केले.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

रिटेल बिझनेसमध्ये येणा-या अडचणी… वसंतकुमार सांगतात की, भारतात रिटेल मार्केट हे सर्वात मोठे मार्केट असून ६० टक्के ग्रामीण भागात याचा समावेश होतो. म्हणूनच येथे बिझनेस करणे महत्त्वाचे आहे पण कठीण नाही. ग्राहकांना येणा-या अडचणींसाठी आम्ही हेल्पलाईन विकसीत केली तसेच प्रोडक्ट लोकांपर्यंत आमचे प्रोडक्ट लवकरात लवकर कसे पोहचेल, यावर भर दिला.

To register for upcoming seminar click here 

९०० कोटींपर्यंचा प्रवास… २२ रुपयांचे कर्ज घेऊन सुरू झालेला बिझनेसचे आज ६७ शोरुम्समध्ये रुपांतर झाले असून त्यांच्या शाखा तामीळनाडू, पद्दूचेरी, बंगळुरू, केरला आणि आंध्र प्रदेश येथे विस्तारल्या आहेत. तसेच ‘वसंत अॅन्ड कंपनी’मधील कर्मचा-यांची संख्या २,९०० वर पोहोचली आहे आणि टर्नओव्हर ९०० कोटी रुपयांहून अधिक वाढला आहे. पुढे वसंतकुमार यांनी ‘वसंत टीव्ही’चे निर्माण केले असून त्यालाही चांगलाच प्रेक्षकवर्ग आहे. अशात-हेने वसंतकुमार यांनी आपली छोटीशी बिझनेस कल्पना वाढवून त्याचा मोठा बिझनेस एम्पायर केला. देशातील बिझनेस करू इछिणा-यांसाठी ही एक प्रेरणादायी बाब आहे.