About Us

स्नेहलनीतीमध्ये आपले स्वागत आहे

' स्नेहलनीती ' ही एक अशी कंपनी आहे जी तुमच्या व्यवसायाचे परिवर्तन करू शकते. आपल्या महाराष्ट्रातील व्यवसायांच्या विस्तार आणि सक्षमीकरणामध्ये स्नेहलनीतीचा सिंहाचा वाटा आहे. स्नेहलनीती कन्सल्टन्सी आपल्या मराठी उद्योजकांना शक्तिशाली आणि यशस्वी बिजनेस कसा करायचा याविषयीचे प्रशिक्षण देते.
बऱ्याचदा आपल्या कानावर वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये पडत असतात...मराठी माणसाने नोकरीच करावी...मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही वगैरे वगैरे..
परंतु स्नेहलनीतीने आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले आहे की मराठी माणूस खूप उत्तम व्यवसाय करू शकतो. प्रशिक्षण आणि कार्यशाळा या माध्यमातून श्री. स्नेहल कांबळे यांनी आतापर्यंत कितीतरी उद्योजकांना प्रेरित करून त्यांच्या व्यवसायाला एक दिशा दिली आहे.त्यांनी आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन त्यांचा बिजनेस वाढवला आहे. स्नेहलनीतीच्या कार्यशाळा मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी होतात. अशाप्रकारे त्यांच्या मदतीने महाराष्ट्रातील बरेचसे व्यवसाय हे 10X पटींनी वाढले आहेत.
श्री.स्नेहल सरांचे एक ध्येय आहे, ते म्हणतात -

" दुकानाच्या पाट्या मराठीत झाल्या पाहिजेतच आणि त्याबरोबरच दुकानातील व्यापारी सुद्धा मराठी असला पाहिजे ..."

आपल्या मराठी माणसाने जास्तीत जास्त उद्योग क्षेत्रामध्ये आपली प्रगती करावी आणि यश संपादन करावे, यासाठी ते दहा वर्षांपासून झटत आहेत.
Snehal Kamble

श्री. स्नेहल कांबळे

- लेखक, उद्योजक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर

एका साधारण मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या 'स्नेहल कांबळे' यांनी मोठ्या कष्टाने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.पुढे आभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करीत आपला सर्वांगीण विकास साधला.नोकरीत मन रमेना म्हणून आपल्या अंतर्गत उपजत असलेल्या उत्तम वक्तृत्त्वावर त्यांनी बिझनेस कोचिंग सुरू केले. त्यानंतर 'उद्योगनीती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' या कंपनीची स्थापना करून स्वतःचा 'स्नेहलनीती' हा ब्रँड विकसित केला आहे. त्यांनी आतापर्यंत 10 लाखांहून अधिक मराठी आणि अमराठी उद्योजकांना सेमिनार आणि सेशन्सद्वारे मार्गदर्शन केले असून कित्येकांचे बिजनेस 1 करोड ते 2000 करोडपर्यंत वाढवले आहेत.

स्नेहलनीती यूट्युब चॅनेल आणि फेसबुकला लाखो फॉलोवर्स जोडले गेले आहेत आणि करोडो व्हिडीओ व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच त्यांनी राज्यभर 10 लाखांहून अधिक लोकांशी संवाद साधला आहे आणि यापुढेही ते आपले बिजनेस ट्रेनिंगचे कार्य सुरुच ठेवणार आहेत.
श्री. स्नेहल कांबळे हे मराठी उद्योजकांना मराठीतून बिझनेसचे धडे गिरवायला शिकवणारे भारताचे नं. 1 बिझनेस कोच असून ते एक लेखक आणि मोटिव्हेशनल स्पीकरदेखील आहेत.

आमच्या कार्यशाळा

10X MBA
  • मार्केटिंग करून योग्य ग्राहकांना आकर्षित कसे करायचे ?
  • सेलिंग करून प्रॉफिट कसे वाढवायचे ?
  • सिस्टिम्स / प्रोसेस कशा बनवायच्या ?
  • डेलिगेशन कसे करायचे ?
  • व्हिजन / मिशन कसे बनवायचे ?
  • स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कसे करायचे ?
  • योग्य टीम कशी अपॉईंट करायची ?
  • चांगल्या सवयी कशा जोपासायच्या ?
  • बिझनेस १० पटीने कसा वाढवायचा ?
10X बिझनेस सिक्रेट्स 2.0
  • बिझनेसमधील नफा कसा वाढवाल ?
  • तुमच्या कर्मचाऱ्यांना कंपनीशी प्रामाणिक आणि हुशार कसे बनवाल ?
  • तुमच्या उपस्थितीशिवाय तुमचा बिझनेस कसा वाढवाल ?
  • बिझनेसमधील समस्यांना कसे संपवाल ?
  • एक आदर्श कंपनी कशी बनवाल ?
  • तुमच्या कंपनीत तुम्ही आदर्श लीडर / कोच कसे बनाल ?
  • आठवड्यातून फक्त २ तास काम करून बिजनेसचे व्यवस्थापन कसे कराल ?
बिजनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट
  • 7 महत्वाच्या कृती / ऍक्शन्स - तुमच्या बिजनेसला यशस्वी बनवण्यासाठी
  • 3 मुख्य गोष्टी - प्रत्येक बिजनेसच्या मालकाने स्वतःचा बिजनेस स्वतःच्या उपस्थितिशिवाय वाढण्यासाठी लक्ष केंद्रित केल्या पाहिजेत
  • 3 पॉवरफुल आणि प्रॅक्टिकल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज - कोरोनानंतरच्या जगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी
  • बिजनेसचा मालक म्हणून तुमचा रोल(भूमिका) आणि गोल(ध्येय) काय असला पाहिजे
  • प्रत्येक बिजनेसच्या मालकाने स्वतःचा बिजनेस स्वतःच्या उपस्थितिशिवाय वाढण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे
  • प्रश्नोत्तरांसाठी राखीव 30 मिनिटे
भारतातील नं. 1 मराठी बिजनेस कोच, श्री. स्नेहल कांबळे यांचे बेस्टसेलर पुस्तक

' जिंकण्यासाठी खेळा !!'