ऍण्ड दी 'ऑस्कर' गोज टू .....

ऍण्ड दी 'ऑस्कर' गोज टू .....


अत्यंत मानाचा असा मानला जाणारा पुरस्कार ज्याला मिळविण्यासाठी जगभरात चित्रपट क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती धडपडत असतो, तो पुरस्कार मिळावा ही इच्छा मनाशी बाळगून तेवढी मेहनत घेण्यास तयार असतो तो पुरस्कार म्हणजे 'ऑस्कर' पुरस्कार अर्थात ऍकॅडमी अवार्ड.. 

चित्रपटाशी निगडित प्रत्येक व्यक्ती त्याच्या चित्रपटाला त्यांच्या परीने त्याचा चित्रपट सर्वोत्तम बनविण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे प्रेक्षक वर्ग एका नवीन कथेचा, विविध गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो. विविध देशातील कलाकारांच्या उत्कृष्ट कलेच्या कामगिरीला गौरवण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो... 


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


कशी झाली ऑस्करची सुरुवात..   
अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार असतात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स' अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली..

पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा मे १६, इ.स. १९२९ रोजी हॉलिवुड रुझवेल्ट हॉटेलमध्ये अंदाजे २७० जणांच्या उपस्थितीत झाला. या सोहळ्याला पाच डॉलर हा प्रत्येकी तिकिटाचा दर होता. इ.स. १९५३ मध्ये ऑस्कर सोहळा प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडापर्यंत दाखवला गेला. इ.स. १९६९ पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित केला जाऊ लागला. सध्या हा २०० पेक्षा अधिक देशात पाहता येतो.


पुरस्कारात मिळणाऱ्या ट्रॉफीचे वैशिष्ट्य... 
ज्या ऍवार्डला मिळविण्यासाठी प्रत्येक कलाकार दिवस-रात्र मेहतन करतो, ती सन्मान चिन्ह म्हणून पुरस्कारात मिळणारी सोनेरी रंगाची ट्रॉफी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. ऑस्करची ट्रॉफी म्हणजे चित्रपटासाठी जीवतोड मेहनत घेतलेल्या व्यक्तीच्या यशाचे प्रतिक असते...

पुरस्कारची ट्रॉफी सोन्याची असते, 'फ़िल्म रिळावर उभा असलेला योद्धा' असे या पुरस्कार ट्रॉफीचे स्वरुप आहे. फ़िल्मची रीळ चित्रपटाच्या पाच अंगाचे प्रतिनिधित्व करते - अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, लेखक.  त्यामुळे ऑस्कर पुरस्कार हे चित्रपटाच्या अशाच विविध कलाकारांना देण्यात येतो. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक ऑस्कर ट्रॉफी पुरस्कारात वितरीत झालेल्या आहेत.


पुरस्कार वितरण सोहळा कसा होतो? 
साधारणपणे जानेवारी महिन्यात चित्रपट सृष्टीसंबंधीत क्षेत्रातील वेगवेगळ्या विभांगाचे नॉमिनेशन जाहिर होते आणि फ़ेब्रुवारी महिन्यात पुरस्काराचे वितरण होते. आपल्या इथल्या पुरस्कार सोहळ्यांसारखी गटबाजी किंवा वशिलेबाजी या सोहळ्यात नसते..


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


विविध देशातून ऑस्करसाठी चित्रपट पाठवले जातात. ५७८३ तज्ञ लोकांची समिती चित्रपट पाहुन योग्य मतदान करते. माननिय मतदार या क्षेत्रातले दिग्ज असतात, मतदारांमधे अभिनेत्याची संख्या लक्षणीय म्हणजे १३११ आहे. २२ टक्के मतदार संख्या इतकी प्रचंड असल्यामुळे दबाव आणने अशक्य होऊन बसते.

हे कलाकार यंदाच्या 'ऑस्कर २०२०'चे मानकरी ठरले... 
अमेरिकेत कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये दरवर्षीप्रमाणे 92व्या ऑस्करचा शानदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यंदा ‘ऑस्कर’ पुरस्कारावर ‘पॅरासाईट’ चित्रपटाने नाव कोरलं आहे. दक्षिण कोरियाई ‘पॅरासाईट’ हा ‘ऑस्कर’वर नाव कोरणारा पहिलाच परभाषिक चित्रपट ठरला आहे. यावर्षीचे प्रमुख आकर्षण असणारा ‘जोकर’ चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता योकीन फीनिक्सने (Joaquin Phoenix) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. तर ‘ज्युडी’ चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रेनी झेल्विगर (Renée Zellweger) हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार 'वन्स अपॉन टाइम इन हॉलिवुड'साठी ब्रॅड पिटला मिळाला. या २०२०च्या सोहळ्यात 'स्लमडॉग मिलेनिअर' या चित्रपटातील 'जय हो' या गाण्याने २००९ सालच्या सोहळ्याच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. 


‘पॅरासाईट’ची ऑस्कर नाईट... 
‘पॅरासाईट’ साठी बोंग जून हो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचाही ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट दोन कुटुंबांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये दक्षिण कोरियातील आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि गरीब कुटुंबातील भेद दाखवण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले (मूळ पटकथा) आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्करही या सिनेमाने पटकावला.
या अत्यंत मानाच्या पुरस्कारासाठी प्रत्येक कलाकार अहोरात्र मेहनत करून एक नवा इतिहास चित्रपट सृष्टीत लिहितो आणि जगभरात त्याच्या कलाकारीला आपल्या समोर प्रस्तुत करतो..