या २५ वर्षांच्या उद्योजिकेने घडविल्या हजारो उद्योजिका!

या २५ वर्षांच्या उद्योजिकेने घडविल्या हजारो उद्योजिका!


आज राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वहीं बनेगा जो हकदार होगा. ह्रितिक रोशनच्या सुपर ३० या चित्रपटातील हे वाक्य. तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे, ते तुमच्या क्षमतेवर, मेहनतीवर, कौशल्यावर ठरते. तुम्ही कोणत्या घरात जन्म घेतला, तुमच्या वाडवडिलांच्या व्यवसाय काय आहे ? यावर नाही. आपल्याकडे वशिला नाही , मोठी ओळख नाही म्ह्णून एका ठराविक क्षेत्रात आपण यश मिळवूच शकणार नाही असा न्यूनगंड अनेकांच्या मनात असतो.  


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


 डॉक्टरची मुलं डॉक्टर, ॲक्टरची ॲक्टर आणि उद्योजकाचीच मुलं उद्योजक होणार, असा आपला एक समज झाला असतो. आपण अशा गैरसमजाला छेद देणारी उदाहरणे रोज समोर येत असतात. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला हे देशातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक आहेत. आता कुमार मंगलम बिर्ला यांची पुढची पिढी हे उद्योजक क्षेत्रातच कार्यरत असेल असे तुम्हाला वाटतं असेल पण त्यांची २५ वर्षीय कन्या अनन्या बिर्ला या एक गायिका आहेत. त्यांची अनेक गाणी लोकप्रिय देखील झाली आहेत. त्या उद्योजिका देखील आहेत पण त्यांचा उद्योग आहे उद्योजिका घडविण्याचा आहे. स्वतंत्र मायक्रोफीन ही त्यांची कंपनी आहे. या कंपनीची स्थापना त्यांनी १७ वर्षाच्या वयात केली.  
 अभ्यासपूर्ण सर्वे करून उद्योग करू शकणाऱ्या आणि लोनची आवश्यकता असणाऱ्या उद्योजिकांची या संस्थेकडून निवड केली जाते. त्यानंतर तेथे एक अधिकाऱ्याची नेमणूक ५-१० लोकांना एकत्र करून स्वतंत्र सहायता समूह तयार केला जातो. मग कार्यशाळांचे आयोजन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर केले जाते. पैशाचे नियोजन कसे करावे याचे ज्ञान दिले जाते. यातील संभाव्य ग्राहक ठरू शकणारे उद्योजक निवडले जातात. मग त्यांना उद्योगासाठी रक्कम दिली जाते. त्यानंतर नियमितपणे कर्जाचा हफ्ता त्यांच्याकडून घेतला जातो. अगदी तळागाळातील स्त्रियांना अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम करण्याचे काम स्वतंत्र मायक्रोफीन ही कंपनी करीत आहे. 

   छोट्या शहरातील किंवा ग्रामीण भागात लघु उद्योग करू इच्छिणाऱ्या होतकरू महिला उद्योजकांना आर्थिक साहाय्य पुरवण्याचे काम ही संस्था करते. उद्योग सुरु करण्यासाठी, वाढवण्यासाठी, चालू ठेवण्यासाठी उत्पन्न होणाऱ्या आर्थिक गरजा या कंपनी मार्फतभागवल्या जातात. १० हजार , २० हजार, ५० हजार अशा अत्यंत छोट्या रकमेची मदत केली जाते. ही रकम मदत म्ह्णून दिली जात नाही. ही रक्कम व्याजावर दिली जाते. म्हणजे ही कंपनी पूर्णपणे व्यवहारी राहून उद्योजकतेची वृत्ती या लोकांच्या अंगात भिनवते.     

सध्या या कंपनीचे ८,७५,५५६ सक्रिय ग्राहक आहेत. आतापर्यंत या कंपनीने ३,८३७ कोटी रुपयांचे कर्ज देऊ केले आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत या कंपनीच्या देशभरात ४४८ शाखा कार्यरत झाल्या आहेत. भारतातील महाराष्ट्र , गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड. उत्तर प्रदेश. ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, पंजाब, हरियाणा, आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे.  


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


 एका यशस्वी उद्योजकाच्या घरी जन्म घेतलेल्या अनन्या यांनी त्यांच्या संगीतातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याचप्रमाणे अंगात कौशल्य, आणि मेहनत करण्याची तयारी असणाऱ्या ग्रामीण भागातील तळागाळातील महिला उद्योजिकांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला. मी या ,महिलांना दान किंवा मदत करीत नसून केवळ थोडे साहाय्य केले. या महिला स्वतःच स्वतःची मदत करीत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आपल्या वडिलांसारखे उद्योग क्षेत्रात त्या प्रत्यक्षरित्या कार्यरत नाहीत. त्या उद्योजक घडवण्याचा उद्योग करीत आहे. आजपर्यंत हजारो स्त्रियांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांच्या या संकल्पामुळे अधिकाधिक महिलांना उद्योजक होण्याची संधी लाभो हीच आमची सदिच्छा.