अशी असावी बिझनेस आयडिया!

अशी असावी बिझनेस आयडिया!


बिझनेस करणे जसे सोपे नाही तसेच अवघडही नाही हे तर आपण सर्वांना माहीतच आहे. अनेकांना रोजचा कंटाळवाणा जॉब नकोसा झालेला असतो.. स्वतःचे असे काहीतरी म्हणजेच स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा अनेकांचा मानस असतो. पण रिस्क आणि भीतीमुळे लोक इन्कम सेफ्टी असलेला आपला जॉब सोडायला सहजासहजी तयार होत नाहीत. पण तरीही अनेक जण असे सुद्धा असतात ज्यांना बिझनेस एके बिझनेस शिवाय दुसरे काहीही सुचत नाही. असे लोक बिझनेस सुरु करण्यासाठी खूप धडपडतात.. 


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी बिझनेस हा एक उत्तम मार्ग आहे. बिझनेसला कोणतीही सीमा नसते. जर तुम्ही यशस्वी झालात तर जगामध्ये नंबर १ स्थानावर पोहोचू शकता. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे तुमची बिझनेस आयडिया आणि तुमची मेहनत. एका चित्रपटात एक डायलॉग आहे, " मोठ्यात मोठा बिझनेस हा पैशांनी नाही तर आयडियाने बनवला जातो." आणि हे अगदी बरोबत आहे, कारण जर तुमच्याकडे बिझनेस आयडिया चांगली नसेल तर तुम्ही कितीही पैसे बिझनेस मध्ये टाका त्यांचा काहीच उपयोग होणार नाही. या आयडियानुसार तुमचे ध्येय ठेवून त्याच्याकडे वाटचाल केली तर बिझनेस सुरु तर होतोच, शिवाय तो यशस्वी सुद्धा होतो. आज अशा ७ चिन्हांबद्दल आपण जाणून घेणार आहोत जी तुमच्याकडे दिसून आली तर तुमच्याकडे एक उत्तम बिझनेस आयडिया आहे हे सिद्ध होईल.  

 

१) प्रॉब्लेम सॉलविंग म्हणजेच समस्या सोडवणारी आयडिया -

तुमच्याकडे जर एक अशी आयडिया आहे जी भविष्यात तुमच्या बिझनेस मध्ये येणाऱ्या अधिकाधिक समस्या सोडवू शकेल तर ती एक उत्तम बिझनेस आयडिया बनू शकेल. बिझनेस मध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल आपल्याला आधीच तर्क लावणे योग्य ठरते. ताशा पद्धतीने त्या समस्यांचे निवारण कसे करता येईल? त्या समस्यांवरील उपाययोजना काय? हे सर्व सोडवणाऱ्या उत्तम कल्पनेचे आधीच नियोजन करता येते. तुमची बिझनेस आयडिया ही प्रॉब्लेम सॉलविंग असेल तर ती एक उत्तम बिझनेस आयडिया बनू शकते.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


२) मोजण्यालायक आयडिया -

भविष्यातील प्रत्येक टप्प्यांवर तुमची बिझनेस आयडिया मोजता येत असेल तर तुमच्याकडे एक उत्तम आयडिया आहे हे लक्षात घ्या. तुमच्या बिझनेस मध्ये टप्प्याटप्प्याने कोणते बदल घडून येणार आहेत किंवा बिझनेसमध्ये होणारे प्रॉफिट आणि लॉस तुम्हाला टप्प्याटप्प्याने मोजता येणार असतील तर अशी बिझनेस आयडिया मोजण्यालायक असते.

३) कॉपी करण्यास अवघड -

जर तुमच्याकडे बिझनेसची अशी एक भन्नाट कल्पना आहे जी इतरांना सहज कॉपी करता येणार नाही किंवा ती कॉपी करणे अतिशय अवघड असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमची बिझनेस आयडिया उत्तम आहे. तुम्ही या आयडिया वर काम करून तुमचा बिझनेस सुरु करू शकता. सहज कॉपी करता न येण्यासारखा बिझनेस अतिशय युनिक ठरू शकतो. त्यामुळे नक्कीच तो उत्तम ठरू शकतो.

४) मोठी मागणी -

एखाद्या गोष्टीची बाजारात वाढती  किंवा मोठी मागणी असेल व ती कमी होणार नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमचा बिझनेस सुरु करू शकता. तुमची बिझनेस आयडिया अशी वस्तू किंवा सेवेच्या निर्मितीकची असेल तर हि एक भन्नाट बिझनेस आयडिया ठरू शकते. मागणी असलेल्या वस्तू किंवा सेवा आपल्या बिझनेस मार्फत पुरवणे यामुळे बिझनेस लाइमलाईट मध्ये येऊन तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

५) लोक त्यासाठी पैसे देण्यास तयार आहेत -

तुमच्या बिझनेस आयडियासाठी लोक हवे तेवढे पैसे देण्यास तयार असतील तर तुमची बिझनेस आयडिया बेस्ट आहे. तुमची सेवा किंवा वस्तू घेण्यासाठी लोकं हवे तेवढे पैसे मोजण्यास तयार असतील तर अजून काय हवे? तुमचा बिझनेस नक्कीच यशस्वी होणार. सेवा किंवा वस्तू याशिवाय तुमची बिझनेस आयडिया सुद्धा अनेक जण खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे येऊ शकतात..


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


६) तुमच्या आयडिया बद्दल उत्साही असणे -

तुमची जी काही बिझनेस आयडिया आहे तिच्याबद्दल तुमच्यात पॅशन असले पाहिजे. आपल्या बिझनेस आयडिया वर काम करण्यासाठी तेवढीच मेहनत घेणे महत्वाचे असते. ही बिझनेस आयडिया पूर्ण करण्यासाठी त्याच पॅशनने काम करू शकत असाल तर तुमची बिझनेस आयडिया ही अतिशय उत्तम आहे असे म्हणता येईल.

७) सर्वात वेगळी आयडिया -

तुमची बिझनेस आयडिया ही इतरांपेक्षा वेगळी किंवा युनिक असेल तर नक्कीच तुमचा बिझनेस यशस्वी ठरू शकतो. इतरांसारखीच जुनी किंवा तीच ती रटाळवाणी बिझनेस कल्पना अनेक जण चालवतात. बिझनेस सुद्धा सुरु करतात. पण त्यांना इतका फायदा होत नाही हे आपण बघतो. त्यामुळे जर तुमची बिझनेस कल्पना इतरांपेक्षा वेगळी असली तर लोकं तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होतील.


तर तुमच्या बिझनेस आयडिया मध्ये तुम्हाला वरील चिन्हे दिसली तर तुम्ही समजून जा की तुमची बिझनेस आयडिया ही एकदम भन्नाट आहे. आणि या आयडियावर काम करणे तुम्ही नक्कीच सुरु करू शकता..